ETV Bharat / state

सुतळी बॉम्बच्या स्फोटात सहा जण जखमी; कोरपना तालुक्यातील घटना - पटाखे

फटाके हे मोकळ्या जागेत फोडले पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे अशा सूचना दरवर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शासन आणि प्रशासनाकडून दिल्या जातात. मात्र नगारिकांकडून त्याकडे दुर्लक्ष होते. याच दुर्लक्ष्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात सुतळी बॉम्बच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

Diwali firecracker blast
सुतळी बॉम्बच्या स्फोटात सहा जण जखमी
author img

By

Published : Nov 11, 2021, 8:43 AM IST

चंद्रपूर - फटाक्यांच्या स्फोटात सहा जण जखमी झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur District) बुधवारी घडली आहे. सुतळी बॉम्बच्या स्फोटात तीन जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे घडली.

एका ठिणगीने फुटले चार बॉम्ब

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी काही व्यक्ती घराबाहेर बसलेले असताना नेताजी शेरकुरे नामक व्यक्ती प्लास्टिक पिशवीमध्ये चार सुतळी बॉम्ब घेऊन आला. त्यातून एक सुतळी बॉम्ब काढून त्याने लगतच फोडला. त्याची ठिणगी उडून बाकीचे पिशवीमधील सर्व सुतळी बॉम्ब एकाचवेळी फुटायला लागले. यात तेथील रमेश पवार (४२), धनराज शेरकुरे (३५), अनिल शेरकुरे (२८) यांच्या हाता - पायाला गंभीर इजा झाली. तर उमेश काळे (३५), रमेश शेरकुरे (१८), लहू काळे (२२) (सर्व रा. पारधीगुडा) हे किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल केले.

यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरीता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.