ETV Bharat / state

चंद्रपुरात आजपासून 'सिरो सर्व्हेलन्स' मोहिमेस सुरूवात; 2 हजार 400 नागरिकांची होणार चाचणी - चंद्रपूर कोरोना रूग्ण

चंद्रपूर प्रशासनाने 'सिरो सर्व्हेलन्स' ही मोहीम हाती घेतली आहे. ह्या चाचणीची मोहीम 23 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भाग मिळून अशा 2 हजार 400 चाचण्या केल्या जातील. या मोहिमेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनासाठीच्या व्यवस्थापनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे.

'सिरो सर्व्हेलन्स' मोहिम
'सिरो सर्व्हेलन्स' मोहिम
author img

By

Published : Oct 23, 2020, 8:43 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात कोरोनाच्या रूग्णसंख्येत घट होत आहे. मात्र, पुढे आणखी कोरोनाची दुसरी लाट येण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. अशावेळी या आव्हानाचे योग्य पूर्वनियोजन करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पाऊल उचलले आहे. प्रशासनाने 'सिरो सर्व्हेलन्स' ही मोहीम हाती घेतली आहे. ज्यांना नकळत कोरोना होऊन गेला अशा व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ज्याची चाचणी 'अँटीबॉडी' टेस्टच्या माध्यमातून केली जाऊ शकते. ह्या चाचणीची मोहीम 23 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण भाग मिळून अशा 2 हजार 400 चाचण्या केल्या जातील. या मोहिमेच्या अहवालानुसार जिल्ह्यातील कोरोनासाठीच्या व्यवस्थापनाची रूपरेषा ठरवली जाणार आहे.

चंद्रपुरात आजपासून 'सिरो सर्व्हेलन्स' मोहिमेस सुरूवात

चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरु झाला. कोरोना बाधितांचा आकडा १३ हजार ९९० च्या घरात पोहचला आहे. यातील दहा हजार ८६१ कोरोना बाधितांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत १९८ लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. आतापर्यंत प्रशासनाने एक लाख ११ हजार ९३४ लोकांची कोरोना चाचणी केली. यात आरटीपीसीआर ५३ हजार ७२२ तर अँटीजेन चाचणी ५८ हजार २१२ जणांनी केली. आरटीसीआर मधील ८ हजार २१४ तर अँटीजेनमध्ये पाच हजार ७७६ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या दोन्ही चाचण्यातील निगेटीव्ह येणाऱ्यांचा आकडा ९६ हजार ४७७ एवढा आहे. आता कोरोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. याकाळात अनेकांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आले, तर काही रूग्णांना लक्षणेच जाणवली नाही.

वैद्यकीय तज्ञांनुसार, कोरोना झाल्यानंतर बरे होणाऱ्या रुग्णांमध्ये अॅन्टीबॉडीज (रोगप्रतिकार शक्ती) तयार होतात. अशा लोकांची नमुना तपासणी करणार आहे. शरीरातील रक्ताचे नमुने घेवून ते तपासले जातात. याच्या किट आता चंद्रपुरात आरोग्य यंत्रणेकडे उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे. तपासणीला २३ ऑक्टोबरपासून सरुवात होईल. सात दिवसात सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात २४०० जणांची अॅन्टीबॉडी चाचणी केली जाईल. यात महानगर पालिका क्षेत्रात ७२५. ग्रामीण एक हजार ६७५ अशी विभागणी केली आहे. यात एक हजार ५० जण हे सामान्य नागरिक असतील. कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रातील १७५ आणि प्रतिबंधात्मक क्षेत्रातील ४५० जणांची अॅन्टीबाडी चाचणी केली जाणार आहे. जिल्ह्यात सध्या नऊ प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे. प्रत्येक प्रतिबंधात्मक क्षेत्रातून ५० जणांची चाचणी होईल. यातील किती जणांच्या शरीरात कोरोनानंतर अॅन्टीबॉडी तयार झाल्या याची माहिती समोर येईल. त्याच्या टक्केवारीतून कोरोना संसर्ग नकळत किती जणांना होवून गेला, याची निश्चित माहिती प्रशासनाच्या हाती येईल. ही आकडेवारी पत्रास टक्क्यांच्यावर गेली तर संभाव्य दुसऱ्या लाटेच्या परिणाम फारसा होणार नाही. मात्र २५ तीस टक्क्यांच्या आसपास आकडेवारी राहिली तर दुसऱ्या लाटेचा परिणाम होवू शकतो. त्यादृष्टीने प्रशासनाला तयारी करता येईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.