चंद्रपूर - राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याचा माणस असलेल्या शिवभोजन योजनेला 26 जानेवारीपासून सुरवात होणार आहे. शहरात तीन ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयांत दहा रुपयांत थाळी उपलब्ध करून देण्यात येईल. यात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि भात असा मेनु असेल. जिल्ह्यासाठी चंद्रपुरात प्राथमिक स्तरावर तीन ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बस स्थानकाजवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवार्ड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयाजवळ वैष्णवी रेस्टॉरंट अन्ड भोजनालय आदी केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये अनुदान कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. चंद्रपूरात 350 थाळींचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
थाळीचा लाभ घेण्यासाठी या असतील अटी
जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच मिळणार आहे. प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. मिस्किन यांनी केले आहे.
चंद्रपुरात शिवभोजन योजनेला 26 जानेवारीपासून होणार सुरुवात - chandrapur latest news
बस स्थानकाजवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवार्ड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयाजवळ वैष्णवी रेस्टॉरंट अन्ड भोजनालय आदी केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये अनुदान कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. चंद्रपूरात 350 थाळींचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
![चंद्रपुरात शिवभोजन योजनेला 26 जानेवारीपासून होणार सुरुवात shiv bhojan scheme will be start in chandrapur from 26 jan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5806725-172-5806725-1579725885461.jpg?imwidth=3840)
चंद्रपूर - राज्यातील गरीब व गरजू जनतेला केवळ 10 रुपयात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याचा माणस असलेल्या शिवभोजन योजनेला 26 जानेवारीपासून सुरवात होणार आहे. शहरात तीन ठिकाणी ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयांत दहा रुपयांत थाळी उपलब्ध करून देण्यात येईल. यात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण आणि भात असा मेनु असेल. जिल्ह्यासाठी चंद्रपुरात प्राथमिक स्तरावर तीन ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बस स्थानकाजवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवार्ड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयाजवळ वैष्णवी रेस्टॉरंट अन्ड भोजनालय आदी केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये अनुदान कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. चंद्रपूरात 350 थाळींचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
थाळीचा लाभ घेण्यासाठी या असतील अटी
जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच मिळणार आहे. प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आर.आर. मिस्किन यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या भोजनालयात दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रति थाळी याप्रमाणे उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यासाठी चंद्रपुरात प्राथमिक स्तरावर तीन ठिकाणी हे केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये बस स्थानक जवळ महसूल भवन येथील मयूर स्नॅक्स कॉर्नर, गंजवार्ड भाजी मार्केट येथील विशाखा महिला बचत गट, सरकारी रुग्णालयात जवळ वैष्णवी रेस्टॉरंट अन्ड भोजनालय या केंद्रांचा समावेश आहे. प्रत्येक थाळीसाठी शहरी भागामध्ये 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये अनुदान कंत्राटदारांना देण्यात येणार आहे. चंद्रपूरात 350 थाळीचे प्रशासनाने नियोजन केले आहे.
थाळीचा लाभ घेण्याच्या अटी व शर्थी
जेवण दुपारी बारा ते दोन या कालावधीतच मिळणार आहे. प्रत्येक संस्थेला अधिकाधिक दीडशे थाळी देणे अनिवार्य आहे. शासकीय कर्मचारी तसेच कोणत्याही आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना भोजनालयात सवलतीच्या दराने जेवणास सक्त मनाई असेल. या योजनेचा लाभ गरीब व गरजू जनतेने घ्यावा ,असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आर. आर . मिस्किन यांनी केले आहे.Body:एखादा फाईल फोटो टाकावाConclusion: