ETV Bharat / state

Forbes' Super 30' : फॉर्ब्सच्या सुपर 30 मध्ये चंद्रपूरचा भूमिपुत्र; 'डोनेटकार्ट'च्या माध्यमातून सारंग बोबडेची गगनभरारी - ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म डोनेटकार्ट

चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्‍या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा 'फोर्ब्स इंडिया' यादीत मान मिळविला आहे.

सारंग बोबडे
सारंग बोबडे
author img

By

Published : Feb 12, 2022, 8:32 AM IST

Updated : Feb 12, 2022, 9:10 PM IST

चंद्रपूर - भारतात नेत्रदीपक काम करणाऱ्या 30 व्यक्तींची यादी 'फॉर्ब्स इंडिया' या मासिकात प्रकाशित केली जाते. चंद्रपुरचा भूमिपुत्र सारंग बोबडेची या मासिकाने दखल घेतली असून त्याला भारतातील 30 सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत स्थान दिले आहे. त्याने विकसित केलेल्या 'डोनेटकार्ट' या ऍपच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थांना मदत करण्याची सोय झाली आहे. अनेक एनजीओंना मदत करताना लोकांना साशंकता असते की ही आपल्या पैशांचा योग्य उपयोग होणार का. हा संभ्रम दूर करण्यासाठी ह्या ऍपची खूप मदत झाली आहे. याचीच दखल फॉर्ब्स इंडियाने घेतली आहे.

'डोनेटकार्ट'च्या माध्यमातून सारंग बोबडेची गगनभरारी

चंद्रपूरच्या 26 वर्षीय सारंग कालिदास बोबडे या युवकाने नावीन्यपूर्ण आणि सकारात्मक बदल घडविण्यासाठी धडपडणार्‍या तरुण, प्रभावशाली उद्योजक, व्यवसायिक, डिझायनर, तसेच खेळाडूंचा 'फोर्ब्स इंडिया' यादीत मान मिळविला आहे. याची दखल 'फोर्ब्स इंडिया' या मासिकाने जागतिक पातळीवर घेतली. या मासिकाने 2022 च्या अंकात भारतातील 30 वर्षाखालील युवकांच्या 30 जणांमध्ये एनजीओ अँड सामाजिक उद्योजकता गटाध्ये 'सहसंस्थापक डोनेटकार्ट' म्हणून अनिलकुमार रेड्डी, संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे यांचा समावेश केला आहे. इतर दोघे हे अन्य राज्यातील आहेत.

मूळचे भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथील रहिवासी असलेले सारंगचे वडील कालिदास बोबडे हे चंद्रपूर तालुक्यातील पिंपरी येथील जनता विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. तर आई याच शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. सारंगचे दहावीपर्यंत शिक्षण चंद्रपूर येथील चांदा पब्लिक स्कूल मध्ये पूर्ण झाले. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मध्ये आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर अनिल कुमार रेडी संदीप शर्मा व चंद्रपूरच्या सारंग बोबडे हे त्रिकुट एकत्र आले. त्‍यांनी डोनेटकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म च्या माध्यमातून अतुलनीय कामगिरी करून हा लौकिक मिळविला. सारंगच्या या यशाविषयी त्याच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला आहे. कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना जेवण डबे उपलब्ध करून देणे. व देशाच्या विविध भागात ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर उपलब्ध करून या सारंग व त्याच्या मित्रांनी लक्षवेधी कामगिरी बजावली आहे.

Last Updated : Feb 12, 2022, 9:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.