ETV Bharat / state

Road Accident In Chandrapur : भरधाव दुचाकीची तरुणाला धडक; नागपूर-चंद्रपूर महामार्गावर पुन्हा एका तरुणाचा मृत्यू - अमोल गोविंदा भडके

Road Accident In Chandrapur : दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी चंद्रपूर नागपूर महामार्गावर घडली. अमोल भडके असं दुचाकीच्या धडकेत ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे.

Road Accident In Chandrapur
प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 6:47 AM IST

चंद्रपूर Road Accident In Chandrapur : दुचाकीच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली. ही घटना चंद्रपूर शहरातील जनता चौकात शनिवारी घडली. अमोल गोविंदा भडके असं दुचाकीच्या अपघातात ( Chandrapur Accident ) ठार झालेल्या तरुणाचं नाव आहे. अमोल हा जनता चौकाकडून जात असताना नागपूर महामार्गावर हा अपघात झाला. दरम्यान चंद्रपूर - नागपूर महामार्गावर अपघाताची मालिका थांबत नसल्यानं चंद्रपूरकरांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे.

दुचाकीच्या धडकेत तरुणाचा मृत्यू : जनविकास सेनेनं आक्रमक भूमिका घेऊन 8 दिवसात अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडं केली होती. या घटनेची शाई वाळण्यापूर्वीच नागपूर मार्गावर पुन्हा एक अपघात झाला. या अपघातात अमोल गोविंदा भडके या तरुणास जीव गमवावा लागला. सायंकाळी 7 वाजतादरम्यान वडगाव प्रभागातील मित्र नगरचे रहिवासी अमोल भडके व त्यांच्या दोन मित्रांना अंजीकर टिव्हीएस शोरुमकडं जायचं होतं. नागपूर मार्गावरील दुभाजक ओलांडण्यासाठी हे तिघं दुभाजकाजवळ उभे असताना जनता कॉलेज चौकाकडून येणाऱ्या दुचाकीनं अमोल भडकेला जोरात धडक दिली. या धडकेत त्याचा मृत्यू झाला. एकामागून एक अपघातात निर्दोष नागरिकांचा बळी जात असल्यानं आता चंद्रपुरात वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अपघातामुळे नागरिक आक्रमक : चंद्रपूर शहरात अपघात सत्र अद्यापही सुरू असल्यानं नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. 4 सप्टेंबरला एकाच दिवशी झालेल्या अपघातात तब्बल तीन जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. यावर काही समाधान निघणार, अशी आशा असताना शनिवारी पुन्हा झालेल्या अपघातात अमोल भडके याचा मृत्यू झाला. त्यामुळे चंद्रपूर शहरातील हे अपघातसत्र कधी थांबणार असा प्रश्न आता नव्यानं निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिक आक्रमक झाले आहेत.

मुनगंटीवारांनी रिंग रोडबाबत भूमिका स्पष्ट करावी : शहरामध्ये वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जड वाहतुकीमुळे नागपूर मार्ग, बंगाली कॅम्प-मूलमार्ग व बायपास मार्ग धोकादायक झालेला आहे. या मार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये आजपर्यंत अनेक नागरिकांचा नाहक बळी गेला. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं प्रस्तावित रिंग रोड रद्द करण्यात आला. जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत. चंद्रपूर शहराला रिंग रोडची अत्यंत गरज असताना प्रस्तावित रिंग रोड रद्द करण्यात आला. मात्र अजूनपर्यंत त्याला पर्याय देण्यात आलेला नाही. पुढील काळात पर्यायी रिंग रोड तयार न केल्यास शहरासाठी अपघाताची समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पर्यायी रिंग रोडबाबत आपली भूमिका जाहीर करावी, अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केली आहे.

हेही वाचा :

  1. Chandrapur Accident : अपघातात मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू ,वडिलांने सोडले प्राण
  2. Chandrapur Accident : चंद्रपुरात कारची बसला जोरदार धडक; सहा ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.