ETV Bharat / state

दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूरने घेतला मोकळा श्वास; सायंकाळी पाचपर्यंत बाजारपेठा सुरू

दोन महिन्याच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्याने मोकळा श्वास घेतला. आजपासून चंद्रपुर जिल्ह्याला संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते.

author img

By

Published : Jun 7, 2021, 5:23 PM IST

Updated : Jun 7, 2021, 7:17 PM IST

Chandrapur
Chandrapur

चंद्रपूर - तब्बल दोन महिन्याच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूर जिल्ह्याने मोकळा श्वास घेतला. आजपासून चंद्रपुर जिल्ह्याला संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते. बाजारपेठा सुरू झाल्या असून दुकाने सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत होऊ लागले आहे.

प्रतिनिधींनी घेतलेला आढावा

राज्य शासनाने कोरोनाच्या पॉझिटिव्हीटी दराप्रमाणे पाच स्तरावर जिल्हे आणि महानगरपालिकेची विभागणी केली आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटिव्हीटी रेट हा 5 टक्क्यांहून कमी असल्याने त्याला पहिल्या स्तरावर टाकण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील टाळेबंदीला मोठी शिथिलता मिळाली आहे.

हेही वाचा - VIDEO: ८५ वर्षाच्या कीर्तनकाराची बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण, सुनांची बघ्याची भूमिका, नातवाच्या आनंदाने उड्या

हे आहेत निर्देश -

अत्यावश्यक व बिगर अत्यावश्यक सेवेतील दुकाने / आस्थापना, सार्वजनिक स्थळे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग, सर्व प्रकारची खासगी कार्यालये, क्रीडा, खेळ, चित्रीकरण, सभा / निवडणूक, स्थानिक प्राधिकरण व सहकारी संस्था यांची आमसभा, बांधकाम शेती विषयक कामकाज नियमितपणे सुरू राहतील. तसेच ई-कॉमर्स, सार्वजनिक क्षेत्रातील बस वाहतुक, माल वाहतूक (जास्तीत जास्त 3 व्यक्ती), आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार, टॅक्सी, बस व ट्रेन) नियमितपणे सुरू राहील. तथापि प्रवासी जर स्तर-5 मधील भागातून येत असेल तर ई-पास आवश्यक राहील. याशिवाय उत्पादन निर्यात प्रदान उद्योग नियमितपणे सुरू राहतील. उत्पादन क्षेत्र, जीवनावश्यक वस्तूची उत्पादन करणारे युनिट ( जीवनावश्यक वस्तू व त्याकरिता लागणारा कच्चामाल उत्पादक पॅकेजिंग व संपूर्ण साखळीतील सेवा) , निरंतर प्रक्रिया उद्योग, राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन, डाटा सेंटर / क्लाऊड सर्विस प्रदाता/ माहिती व तंत्रज्ञान सेवा संबंधी, गुंतागुंतीचे पायाभूत सेवा ‌व उद्योग, उत्पादन क्षेत्रातील उद्योग व सेवा नियमितपणे सुरू राहतील.

50 टक्के क्षमतेने या बाबी राहतील सुरू

मॉल्स, सिनेमागृह (मल्टीप्लेक्स, सिंगल स्क्रीन), नाट्यगृहे, रेस्टॉरेंट, सामाजिक, सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम, लग्न समारंभ (सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने तथापि कमाल 100 व्यक्तिंच्या मर्यादेत), व्यायामशाळा, सलून, केस कर्तनालय, ब्यूटी पार्लर / स्पा/ वेलनेस सेंटर (अपॉइंटमेंट घेणे आवश्यक).

अंत्यविधी 20 व्यक्तिंच्या मर्यादेत करण्याची मुभा देण्यात आली आहे.

वरील बाबी सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली असली तरी कोरोना विषयक वर्तणुकीचे पालन करणे बंधनकारक राहील. यात नियमितपणे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचे पालन, आस्थापना / दुकानांच्या प्रवेशद्वाराजवळ ग्राहकांकरिता, प्रवेश करणाऱ्यांना हात धुण्याकरिता साबण किंवा हँड सॅनिटायझर ठेवणे आवश्यक राहील.

सदर नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित आस्थापना/ दुकाने बंद ठेवण्यात येईल. तसेच यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे दंडसुद्धा आकारण्यात येईल. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा संघटनाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये दंडनीय कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा - मराठा आरक्षण मुद्यावर मुख्यमंत्री घेणार पंतप्रधानांची उद्या भेट

Last Updated : Jun 7, 2021, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.