चंद्रपूर - गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्याला पाऊस झोडपत आहे. एकीकडे कुडकुडणारी थंडी, तर दुसरीकडे धो धो बरसणारा पाऊस, असे विचित्र वातावरण तालुक्यात बघायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे हरबरा, मुग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा - डॉ. पायल तडवीला न्याय कधी देता, कॅन्सरग्रस्त आईचा सरकारला सवाल
तालुक्यात सध्या थंडी आणि पावसाचा खेळ सुरू आहे. शुक्रवारी मध्यरात्री जोरदार पाऊस बरसला. त्यानंतर आज दुपारी पुन्हा सरी बरसल्या. या पावसामुळे नदी-नाले तुडूंब भरून वाहत असून परिसरात गारवा निर्माण झाला आहे.
हेही वाचा - उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर तयार होणार बायोपिक, 'ओह माय गॉड' चित्रपटाचे दिग्दर्शक करणार दिग्दर्शन