चंद्रपूर - राज्य आणि मुंबई महापालिकेने लसीकरणासाठी जागतिक निविदा काढली होती. मात्र, ही निविदा रद्द होण्यामागे केंद्र सरकारचे राजकारण कारणीभूत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
हेही वाचा - चंद्रपूर - अंतसंस्कारालाही जातपंचायतीचा बहिष्कार, शेवटी मुलींनीच दिला पार्थिवाला खांदा
आंतरराष्ट्रीय व्यवहार करताना केंद्र सरकारचा प्रभाव या कंपन्यांवर असतो. म्हणून राज्याने जागतिक निविदा काढूनही कंपन्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. यामागे केंद्र सरकारचे राजकारण कारणीभूत आहे. पंतप्रधान मोदी यांनी 75 टक्के लसीकरण केंद्र सरकार करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, सर्वांना मोफत लस मिळावे, ही काँग्रेसची भूमिका आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत लवकरच चौकशी समिती नेमणार
महापौर राखी कंचर्लावार यांच्या कार्यकाळात 200 कोटींची अनियमितता निदर्शनास आली. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे प्राथमिकदर्शी समोर येत आहे. यासंदर्भात भाजप आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाना पटोले यांची भेट घेऊन तातडीने चौकशी नेमावी, अशी मागणी केली. याबाबत पटोले बोलले, हा गैरव्यवहार अत्यंत गंभीर आहे. यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, येत्या काही दिवसांतच शासन स्तरावर या गैरव्यवहारावर चौकशी लावण्यात येईल.
हेही वाचा - दोन महिन्यांच्या टाळेबंदीनंतर चंद्रपूरने घेतला मोकळा श्वास; सायंकाळी पाचपर्यंत बाजारपेठा सुरू