ETV Bharat / state

लक्कडकोटमध्ये पोलिसांकडून दहा लाखांची सुगंधित तंबाखू जप्त - chandrapur corona crisis

राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू, गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. गाडीत सुगंधित तंबाखू 108 चे 40 डब्बे, विमल गुटख्याचे 5 पोते, सिगरेटचे 5 पोते आढळून आले. एकूण दोन लाखांचा तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आणि आठ लाखांचे वाहन असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

aromatic tobacco in Lakkadkot
लक्कडकोटमध्ये पोलिसांकडून दहा लाखांची सुगंधित तंबाखू जप्त
author img

By

Published : May 7, 2020, 11:41 PM IST

चंद्रपूर - राज्यात बंदी असलेल्या सुंगधित तंबाखू, गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनाला पोलिसांनी सापडा रचून पकडले. वाहनात मोठ्या प्रमाणात बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ होते. एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चौघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई विरूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या लक्कडकोट येथे करण्यात आली.

तेलंगणा-महाराष्ट्र सिमेवरीलं लक्कडकोट येथून बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहीती विरुर पोलीसांना मिळाली. विरुर पोलीसांनी सिध्देश्वर गावाचा पुढे लक्कडकोट मार्गावर नाकेबंदी केली. नाकेबंदी दरम्यान आयसर वाहनाची (एमएच 34 बीजी 5897) तपासणी केली असता त्यात राज्यात बंदी असलेला सुगंधित तंबाखू, गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला. गाडीत सुगंधित तंबाखू 108 चे 40 डब्बे, विमल गुटख्याचे 5 पोते, सिगरेटचे 5 पोते आढळून आले. एकूण दोन लाखांचा तंबाखूजन्य पदार्थाचा साठा आणि आठ लाखांचे वाहन असा एकूण दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

वाहन चालक आनंद साबय्या तूगडी, शंकर मल्लेश आत्राम, कलीम अली सय्यद, वासूदेव सिडाम या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. संबंधीत कारवाई उपविभागीय अधिकारी स्वप्नील जाधव यांचा मार्गदर्शनात कृष्णा तिवारी, सदानंद वडतकर, मानिक वाग्दरकर, अशोक मडावी, सूरेंद्र कांबळे, विजय तलांडे, अतुल शहारे, भगवान मुंडे यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.