ETV Bharat / state

चंद्रपूर : विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे पोलिसांनी वाचवले प्राण; सिंदेवाही येथील घटना

सिंदेवाही येथील एक व्यक्ती विहिरीच्या बाजूला काहीतरी करत होता. यावेळी त्याचा तोल जाऊन अचानक विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र, यात त्याला जखमा झाल्या आणि तो मानसिक धक्क्यात होता.

Police save one citizen life who fallen in well sindevahi chandrapur
विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे पोलिसांनी वाचवले प्राण
author img

By

Published : May 12, 2021, 8:23 PM IST

Updated : May 12, 2021, 9:04 PM IST

चंद्रपूर - विहिरीत पडलेल्या एकाला चंद्रपूर पोलिसांना वाचविले आहे. सिंदेवाही शहरातील सिद्दार्थ चौक येथे आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरची दृश्ये.

पोलिसांची घटनास्थळी धाव -

सिंदेवाही येथील एक व्यक्ती विहिरीच्या बाजूला काहीतरी करत होता. यावेळी त्याचा तोल जाऊन अचानक विहिरीत पडला. विहिरीत पाणी असल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र, यात त्याला जखमा झाल्या आणि तो मानसिक धक्क्यात होता. अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली. काहींनी प्रयत्न केला. मात्र, त्याला बाहेर काढणे जमले नाही. याबाबत सिंदेवाही पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी दोर टाकून बघितला. मात्र, त्याला बाहेर काढणे जमले नाही. अखेर पोलिसांनी युक्त करत एक टायर आणि त्याला दोन बाजूला दोन दोर बांधले. त्यात त्या व्यक्तीने आपले दोन्ही पाय टाकले आणि तो टायरला लटकला. यानंतर त्याला दोन्ही बाजूने दोराने वर खेचण्यात आले. अखेर त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.

हेही वाचा - पोलीस निरिक्षक पतीचा कोरोनाने मृत्यू, तिसऱ्याच दिवशी डॉक्टर पत्नी कामावर झाली रुजू

Last Updated : May 12, 2021, 9:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.