राजूरा ( चंद्रपूर ) - संचारबंदीत जूगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीत गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेना गटनेत्याचा समावेश आहे. पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एक लाख 65 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईने राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
कोरपना तालूक्यातील गडचांदूर येथील नरेश टाॕकीजच्या वरच्या मजल्यावर जुगार खेळला जात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांनी धाड टाकली असता सहा व्यक्ती जूगार खेळतांना आढळून आले. यामध्ये शिवसेनेचे गटनेते सागर ठाकूरवार, रतन नकुलवार, शंकर श्रीरसागर, गणेश सातपाळी, गणेश कोल्हे आणि राजेश महाडोळे या आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून 1 लाख 65 हजार 375 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.
शिवसेनेचा गटनेत्यासह पाच जणांना अटक; जुगार खेळणे भोवले
संचारबंदीत जूगार खेळणाऱ्या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीत गडचांदूर नगर पालिकेतील शिवसेना गटनेत्याचा समावेश आहे.