चंद्रपूर - गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावात एका नागरिकाच्या शौचलयाच्या पायरीवर नाग निघाल्याने कुटुंबीयांची भंबेरी उडाली. त्यानंतर सर्पमित्राला बोलवून मोठ्या शिताफीने नागला पकडून सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.
अडेगाव येथील शंकर राऊत हे सायंकाळचा सुमारास शौचालयात जायला निघाले. मात्र, शौचालयाचा पायरीवरच नागोबा ठाण मांडून होते. त्यानंतर शंकर राऊत यांचा मुलगा सुभाषने अनखोडा येथील सर्पमित्र प्रदिप नागुलवार, मृणाल वाकुडकार यांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी सर्पमित्रांनी घटनास्थळ गाठून नागोबाला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले.