ETV Bharat / state

धक्कादायक! चंद्रपूरमध्ये आदिवासी वसतिगृहात मुलींचे लैंगिक शोषण - molestation

संबंधित संस्थेतील आदिवासी वसतिगृहातील मुली गेल्या काही महिन्यांपासून अचानक बेशुद्ध पडत होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करून थातुरमातूर उपचार केले जात होते. असे सातत्याने होत होते. मागील आठवड्यात, अशाच २ मुलींना भरती करण्यात आले होते. त्यामुळे येथील डॉक्टरांना शंका आली.

सांकेतिक छायाचित्र
author img

By

Published : Apr 13, 2019, 9:58 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील एका नामांकीत अदिवासी मुलींच्या वसतिगृहामधील काही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी २ मुलींना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी एक मुलगी ९ वर्षांची तर दुसरी मुलगी १० वर्षांची आहे. हा प्रकार वसतिगृहात घडल्याची चर्चा या परिसरात आहे. याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत.

संबंधित संस्थेतील आदिवासी वसतिगृहातील मुली गेल्या काही महिन्यांपासून अचानक बेशुद्ध पडत होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करून थातुरमातूर उपचार केले जात होते. असे सातत्याने होत होते. मागील आठवड्यात, अशाच २ मुलींना भरती करण्यात आले होते. त्यामुळे येथील डॉक्टरांना शंका आली. या मुलींची शारीरिक तपासणी केली असता त्यांच्या गुप्तांगावर सूज असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा धक्कादायक अमानुष प्रकार उघडकीस आला.

या मुलींची तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. ही बाब एका सामाजिक संस्थेच्या सदस्यांना माहिती झाली. यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार या वसतिगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, याबाबत अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. चौकशीअंती कारवाई होईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे म्हणणे आहे.

यापूर्वी नोव्हेंबरमध्ये याच संस्थेत असाच एक प्रकार समोर आला होता. ज्यात नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीचा प्राचार्य शारीरिक छळ करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्राचार्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. आता तर त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Intro:चंद्रपुर : राजुरा येथील इंफॅन्ट जिझस अदिवासी मुलींच्या वसतिगृहातील काही मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यापैकी दोन मुलींना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. यापैकी एक 9 वर्षाची तर दुसरी मुलगी 10 वर्षांची आहे. हा प्रकार वसतिगृहात घडल्याची चर्चा या परिसरात आहे. याची कसून चौकशी पोलीस करीत आहेत. Body:
राजुरा येथे इंफॅन्ट जिझस कॉन्व्हेंट तसेच मुलींचे वसतिगृह आहे. ह्या संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे तर सचिव नगराध्यक्ष अनिल धोटे आहेत. ह्या संस्थेतील आदिवासी वसतिगृहातील मुली मागील काही महिन्यांपासून अचानक बेशुद्ध पडत होत्या. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती करून थातुरमातुर उपचार केले जात होते. असे सातत्याने होत होते. मागील आठवड्यात अशाच दोन मुलींना भरती करण्यात आले होये. त्यामुळे येथील डॉक्टरांना शंका आली. या मुलींची शारीरिक तपासणी केली असता त्यांच्या गुप्तांगावर सूज असल्याचे दिसून आले. त्यानंतर हा धक्कादायक अमानुष प्रकार उघडकीस आला. ह्या मुलींची तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपुर मेडिकल कॉलेजमाध्ये भरती करण्यात आले. ही बाब मर्दानी महिला मंचाच्या सदस्यांना माहिती झाली असता त्यांनी पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे स्वतः या वसतिगृहात पोचले यावेळी आदीवासी विकास प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर हे देखील होते. या वसतिगृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र, याबाबत अद्याप कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. चौकशीअंती कारवाई होईल असे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे म्हणणे आहे. Conclusion:
यापूर्वी नोव्हेंबरमध्ये याच संस्थेत असाच एक प्रकार समोर आला होता ज्यात नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थिनीवर प्राचार्य शारीरिक छळ करीत होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्राचार्याची हकालपट्टी करण्यात आली होती. आता तर त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.