ETV Bharat / state

चंद्रपुरात जनता कर्फ्यूला पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद, पुढील ३ दिवस निर्णायक - 4 days janta curfew chandrapur

आज पहिल्या दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. शहरातील सर्व आस्थापने, दुकाने आणि इतर उद्योग बंद ठेवण्यात आले. त्यामुळे, संपूर्ण शहरात आज शुकशुकाट होता. सर्व दुकाने बंद असल्याने नागरिकही घराबाहेर फिरकले नाही.

जनता कर्फ्यू
जनता कर्फ्यू
author img

By

Published : Sep 10, 2020, 7:53 PM IST

चंद्रपूर- जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात ४ दिवसीय जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे. आज पहिल्या दिवशी त्याला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळताना दिसला. आज सर्व दुकाने, आस्थापने आणि बाजार बंद होते. नागरिकांनीही घराबाहेर जाण्याचे टाळले. त्यामुळे, नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणेचीही गरज भासली नाही.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

जिल्ह्यात मागील २० दिवसात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. ८९८ रुग्णांची संख्या आता थेट साडेचार हजारांच्या घरात गेली आहे. तसेच, मृतकांच्या आकड्यात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यातही एकूण रुग्णांच्या ४५ टक्के रुग्ण हे एकट्या चंद्रपूर शहरातील आहेत. अशात कोरोना संसर्ग थांबवण्यासाठी १० ते १३ सप्टेंबरदरम्यान चंद्रपूर तसेच बल्लारपूर शहरात जनता कर्फ्यू लावण्याच्या निर्णय घेण्यात आला. सोबत उर्जानगर, दुर्गापूर आणि पडोली येथेही देखील कर्फ्यू लावण्यात आला. तत्पूर्वी प्रशासनाने व्यापारी, कामगार संघटनांशी चर्चा करून कर्फ्यू प्रक्रियेत सामील होण्याचे आवाहन केले होते. या सर्व संघटनांनी कर्फ्यूला पाठिंबा देत आपली आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

या पार्श्वभूमीवर आज पहिल्या दिवशी बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. शहरातील सर्व आस्थापने, दुकाने आणि इतर उद्योग बंद ठेवण्यात आले. त्यामुळे, संपूर्ण शहरात आज शुकशुकाट होता. सर्व दुकाने बंद असल्याने नागरिकही घराबाहेर फिरकले नाही. त्यामुळे, पोलीस पाहाऱ्याची देखील गरज भासली नाही. मात्र, पुढील ३ दिवस हे निर्णायक असणार आहेत. यादरम्यान अशीच स्थिती राहिली तर कोरोनाची साखळी तोडण्यात मोठी मदत होणार आहे.

हेही वाचा- पूरग्रस्तांना काय दिलं, अंबाडीचा भुरका? - अ‌ॅड. पारोमिता गोस्वामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.