ETV Bharat / state

BJP Arranged Parking On Deekshabhoomi भाजप अध्यक्षांच्या प्रचारसभेसाठी दीक्षाभूमीवर उभारले वाहनतळ, नागरिकांकडून संताप - बौद्ध धम्माची दीक्षा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ( JP Nadda Rally In Chandrapur ) यांची आज चंद्रपुरात सभा होती. या सभेसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांसाठी दीक्षाभुमीवर वाहनतळ ( BJP Arranged Parking On Deekshabhoomi) करण्यात आले होते. मात्र त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागपूरनंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर ( Babasaheb Ambedkar ) यांनी चंद्रपुरातील नागरिकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे बाबासाहेबांच्या या दीक्षाभुमीवर वाहनतळ ( Parking On Deekshabhoomi For JP Nadda Rally )केल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

BJP Arranged Parking On Deekshabhoomi
भाजप अध्यक्षांच्या प्रचारसभेसाठी दीक्षाभूमीवर वाहनतळ
author img

By

Published : Jan 2, 2023, 7:40 PM IST

Updated : Jan 2, 2023, 8:11 PM IST

चंद्रपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा ( JP Nadda Rally In Chandrapur ) यांच्या सभेसाठी दीक्षाभूमीवर वाहनतळ ( BJP Arranged Parking On Deekshabhoomi) उभारण्यात आल्याने समाजमाध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ( Babasaheb Ambedkar ) याच पवित्र भूमीवर आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. मात्र याच परिसराचा वापर भाजपकडून शेकडो वाहने ( Parking On Deekshabhoomi For JP Nadda Rally ) ठेवण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे समाजमाध्यमातून यावर आक्षेप ( People Aggressive About BJP ) घेत निषेध व्यक्त केला जात आहे. पवित्र धार्मिक स्थळ असलेला हा परिसर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि विशेषत घोटेकर परिवाराने भाजपच्या दावणीला बांधला आहे का? असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

भाजप अध्यक्षांच्या प्रचारसभेसाठी दीक्षाभूमीवर उभारले वाहनतळ, नागरिकांकडून संताप

नागपूरनंतर चंद्रपुरात बौद्ध धम्माची दीक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपुरात ( BJP Arranged Parking On Deekshabhoomi) लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर 16 ऑक्टोबर 1956 रोजी चंद्रपुरात देखील लाखो समाजबांधवांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. तेव्हापासून येथे दरवर्षी 15 आणि 16 ऑक्टोबरला येथे धम्मचक्र अनुप्रवर्तनदिन साजरा केला जातो. बाबासाहेबांच्या विचारांचा ठेवा जागृत ठेवण्यासाठी येथे दोन दिवसीय वैचारिक कार्यक्रम घेतले जातात. यासाठी जिल्हा तसेच इतर ठिकाणाहून आंबेडकरी अनुयायांची लाखोंच्या संख्येने उपस्थिती असते. दर रविवारी येथील बौद्ध विहारात देखील येथे शहरातील अनेक बौद्ध उपासक-उपासीका येत असतात. या परिसरात लाखो बौद्ध अनुयायांचा आस्थेचा विषय आहे.

भाजप पक्षाचा झेंडा घेऊन शेकडोंच्या संख्येने दाखल झाली वाहने आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ( JP Nadda Rally In Chandrapur )यांच्या जाहीर सभेचे आयोजन दर्गा मैदानात केले होते. चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने वाहनातून भाजप कार्यकर्ते येथे दाखल झाले. त्यांची वाहने ठेवण्यासाठी प्रशासनाकडून चक्क दीक्षाभूमीला वाहनतळ बनविण्यात आले. वाहनचालकांना हा परिसर शोधण्यासाठी ठीकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात आले मात्र त्यात जाणीवपूर्वक दीक्षाभूमीचा ( People Aggressive About BJP Arranged Parking ) उल्लेख टाळण्यात आला. दुपारपर्यंत भाजप पक्षाचा झेंडा घेऊन शेकडोंच्या संख्येने येथे वाहने उभी करण्यात आली. ही बाब समाजमाध्यमात व्हायरल झाली आणि तीव्र निषेधाच्या प्रतिक्रिया यावर येऊ लागला. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे, उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, ऑल इंडियन रिपब्लिकन पार्टीचे प्रतीक डोरलीकर यांनी या प्रकारावर आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. तसेच समाजमाध्यमातून देखील यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने दीक्षाभूमी परिसर भाजपच्या दावणीला बांधला आहे का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

यापूर्वी देखील झाला होता असाच प्रयत्न यावर्षीच्या धम्मचक्र अनुप्रवर्तनदिनी भाजपचे फलक दीक्षाभूमीच्या आतल्या परिघात लावले होते. त्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी यावर तीव्र आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे फलक दबावापोटी काढावे लागले होते.

घोटेकर आणि भाजप संबंध दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या ( BJP Arranged Parking On Deekshabhoomi ) अंतर्गत येते. याचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष मारोतराव खोब्रागडे, अशोक घोटेकर, सचिव वामनराव मोडक, सहसचिव कुणाल घोटेकर, सदस्य अॅड. राहुल घोटेकर अशी 15 जणांची ही सोसायटी आहे. यावर घोटेकर कुटुंबाचे प्राबल्य आहे. अध्यक्ष अरुण घोटेकर, त्यांचे भाऊ अशोक घोटेकर, त्यांची दोन मुले कुणाल घोटेकर, अॅड. राहुल घोटेकर, त्यांची पत्नी यांचा या सोसायटीत समावेश आहे. अॅड. राहुल घोटेकर हे भाजपचे पदाधिकारी आहेत. ते भाजपचे नगरसेवक राहिले आहेत. तेव्हापासून घोटेकर कुटुंबाकडून आपल्या अधिकारांचा वापर करून भाजपचे लांगुलचालन करत असल्याचा आरोप होतो आहे. आपला राजकिय स्वार्थ साधण्यासाठी दीक्षाभूमीचा वापर भाजपच्या सोयीसाठी करण्यात येत असल्याचा आरोप आजच्या या प्रकरणी केला जात आहे.

भाजपचा झेंडा नको अशा सूचना होत्या - राहुल घोटेकर जिल्हा प्रशासनाने पार्किंगच्या सोयीनुसार दीक्षाभूमी परिसराची निवड करण्यात आली. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून आम्ही स्पष्ट सूचना दिल्या होत्या, की इथे कुठंही कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा फलक नको. याचे पालन करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची होती, तसे कुठलेही झेंडे यावेळी आपल्याला दिसले नाही, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक तसेच या सोसायटीचे सदस्य अॅड. राहुल घोटेकर यांनी केला. सोसायटीच्या माध्यमातून भाजपला मदत करण्याचा आरोप हा निराधार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Last Updated : Jan 2, 2023, 8:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.