ETV Bharat / state

Lake Fishing: जाचक अटीमुळे जिल्ह्यातील 93 तलावांची मासेमारी रखडली; केवळ 9 तलावांचे नूतनीकरण

Lake Fishing: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तलाव आहे. या तलावांत मत्स्य सोसायट्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून मासेमारी सुरू आहे. मासेमारी करीत असलेल्या तलावांचे दर 5 वर्षांनी ठेका नुतनीकरण करावे लागते. मत्स्य विकास विभागाने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी एक परिपत्रक काढले.

Lake Fishing
Lake Fishing
author img

By

Published : Nov 10, 2022, 9:29 PM IST

चंद्रपूर: मागच्या वर्षी शासनाने काढलेल्या परिपत्रकामूळे जिल्ह्यातील तलावातील मासेमारी प्रभावित झाली आहे. मत्स्य विभागाने काढलेल्या परिपत्रकानुसार आता ना हरकत प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 93 तलावांचे मासेमारीचे कंत्राट रखडले आहे, जिल्ह्यातील केवळ 9 तलावांचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

एनओसीची जाचक अट: जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तलाव आहे. या तलावांत मत्स्य सोसायट्यांच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षांपासून मासेमारी सुरू आहे. मासेमारी करीत असलेल्या तलावांचे दर 5 वर्षांनी ठेका नुतनीकरण करावे लागते. मत्स्य विकास विभागाने २५ नोव्हेंबर २०२१ रोजी एक परिपत्रक काढले. त्यात ना हरकत प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय तलाव ठेका नुतनीकरण होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. जिल्ह्यातील बहुतांश मत्स्य सहकारी सोसायट्या 30 ते 40 वर्षांपूर्वी नोंदणीकृत झाल्या. तेव्हा एनओसीसह अन्य काही कागदपत्रांची गरज नव्हती. मात्र, आता एनओसीची जाचक अट टाकण्यात आली. एनओसीच मिळत नसल्याने तलाव ठेका नुतनीकरणाची प्रक्रिया थंडबस्त्यात पडली असून मासेमारीही सध्या बंद आहे.

पाटबंधारे विभागाच्या तलावांवर मासेमारी: चंद्रपूर जिल्ह्यात एक हजार ९६४ तलाव आहे. या तलावांचे क्षेत्र १९ हजार ३८९ हेक्टर आहे. त्यापैकी एक हजार १६४ तलावांवर मत्स्य सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून मासेमारी चालते. या तलावांचे क्षेत्रफळ १७ हजार १३२ इतके आहे. मत्स्य विभाग पाटबंधारे विभागाच्या तलावांवर मासेमारी करते. पाटबंधारे विभागाचे एकूण ९३ तलाव आहेत. या तलावांवर मत्स्य सहकारी सोसायट्या मासेमारी करतात. मासेमारी करीत असलेल्या तलावांचे दर पाच वर्षांनी नुतनीकरण करावे लागते. नुतनीकरणाची प्रक्रिया आधी सरळ होती.

नोंदणीची प्रक्रियाही सोपी: मात्र २१ नोव्हेंबर २०२१ रोजी विभागाने एक परिपत्रक काढले. त्यात ना हरकत प्रमाणपत्राची जाचक अट टाकली. मुळात चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक मत्स्य सहकारी सोसायट्या या १९६०, ७०, ८० च्या काळी स्थापन झाल्या. त्यावेळीही नोंदणीची प्रक्रियाही सोपी होती. तेव्हा ना हरकत प्रमाणपत्र गरजेचे नव्हते. मात्र, आता ज्या तलावांचे नुतनीकरण करायचे आहे. त्याची माहिती सहायक निबंधक दुग्ध विभागाला सादर करावी लागेल. त्यानंतर हा विभाग कोणत्या तलावावर कोणती संस्था नोंदणीकृत आहे याची माहिती मत्स्य विभागाकडे सादर करेल. त्यानंतर मत्स्य विभाग सोसायट्यांना ना हरकत प्रमाणपत्र देणार आहे.

१६७ मत्स्य सहकारी सोसायट्या: ३० जूनपर्यंत तलाव ठेका नुतनीकरण करावे लागते. मात्र, आतापर्यंत केवळ नऊ तलावांचे नुतनीकरण झाले. ३१ तलाव ठेका नुतनीकरणाची प्रक्रिया अजूनही झाली नाही. त्याचे कारण ना हरकत प्रमाणपत्र आहे. जिल्ह्यात १६७ मत्स्य सहकारी सोसायट्या आहेत. या सोसाट्यांशी २० हजार सदस्य जुळले आहेत. 3 सोसायट्या अवसायानात निघाल्या आहेत.

लवकरच तोडगा निघेल; मत्स्य विकास अधिकारी: याबाबत मत्स्य विभागाचे सहायक विकास मत्स्य अधिकारी निखिल नरड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी लवकरच यावर तोडगा निघणार असल्याचे सांगितले. याबाबत प्रादेशिक आयुक्त मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्याअनुशंगाने कारवाई सुरू आहे. यावर लवकरच तोडगा निघेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.