ETV Bharat / state

चर्चेसाठी आमची दारे खुलीच, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत नाही : मुनगंटीवार - सुधीर मुनगंटीवार लेटेस्ट न्यूज

'चर्चेसाठी आमची दारे नेहमीच खुली आहेत' असे  मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. चर्चेसाठी सेनेने पुढाकार घ्यावा असे भाजपला अपेक्षित आहे. तसेच सेनेने प्रसार माध्यमातून घेतलेली भूमिका यावर देखील भाजपला तीव्र आक्षेप असल्याचे दिसते.

चर्चेसाठी आमची दारे खुलीच, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चर्चा होत नाही : मुनगंटीवार
author img

By

Published : Nov 2, 2019, 1:27 AM IST

चंद्रपूर - सत्तास्थापणेसाठी सेना जरी आक्रमक झाली असली तरी भाजपसुद्धा नमते घ्यायला तयार नाही. सेना जाहीरपणे भाजपवर नाराजी प्रकट करीत असली तरी प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून सेनेला अप्रत्यक्षपणे 'अल्टीमेटम' देण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीच्या सत्तास्थापणेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ईटीव्ही भारतला दिलेल्या मुलाखतीतुन हेच दिसून येत आहे.

चर्चेसाठी आमची दारे खुलीच - मुनगंटीवार

हेही वाचा - 'तिकीट वाटपात पैसे घेतले'; इम्तियाज जलील यांच्यावर पक्षातील माजी पदाधिकाऱ्याचा आरोप

'चर्चेसाठी आमची दारे नेहमीच खुली आहेत' असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. चर्चेसाठी सेनेने पुढाकार घ्यावा असे भाजपला अपेक्षित आहे. तसेच सेनेने प्रसार माध्यमातून घेतलेली भूमिका यावर देखील भाजपला तीव्र आक्षेप असल्याचे दिसते. त्यावर मुनगंटीवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली. शिवसेनेला सत्तास्थापण करण्यासाठी जी पदे अपेक्षित आहेत ती देण्यास भाजप अजिबात उत्सुक नाही. त्यामुळे महायुतीचा तिढा निकालाला आठवडा लोटूनही अजून सुटलेला नाही. सेना मुख्यमंत्री पदाची मागणी करीत असताना भाजप मात्र ही मागणी धुडकावून लावत आहे. त्यामुळेच सेना आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त करीत आहे. मात्र, या नाराजीवर भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या माध्यमातून सेनेला गर्भित इशारा देखील दिला जात आहे.
एखाद्या पदासाठी चर्चा रोखुन धरणे यापेक्षा संवादाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणे हे अधिक महत्त्वाचे आहे असे मुनगंटीवार म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी निकालाच्या दिवशी सत्तेसाठीची चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्तीने होईल असे सूचक वक्तव्य केले होते. उद्धव यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करावीशी वाटत असेल तर कोणत्याही क्षणी दिल्ली येथे जाऊन चर्चा करता येऊन शकते. उद्धव यांनी सांगितले, 'मी दिल्लीला यायला तयार आहे तर चर्चा सुरू होईल', असे मुनगंटीवार म्हणाले.

सेनेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या टीकेबातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सामान्य जनतेच्या मनात पक्षाची विश्वासार्हता कमी होते असेही ते म्हणाले. मेरीटच्या आधारावर होणारी चर्चा आणि राष्ट्रपती राजवट लागण्याच्या त्यांच्या वक्तव्याचाही मुनगंटीवार यांनी खुलासा केला. एकंदरीत भाजपही नमते घ्यायला तयार नाही असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

Intro:चंद्रपूर : सत्तास्थापणेसाठी सेना जरी आक्रमक झाली असली तरी भाजपसुद्धा नमते घ्यायला तयार नाही. सेना जाहिरपणे भाजपवर नाराजी प्रकट करीत असली तरी प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून सेनेला अप्रत्यक्षपणे अल्टीमेटम देण्यात येत आहे. त्यामुळे महायुतीच्या सत्तास्थापणेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ईटीव्हीला दिलेल्या मुलाखतीतुन हेच दिसून येत आहे. चर्चेसाठी आमची दारे नेहमीच खुली आहेत असे त्यांनी म्हटले आहे, म्हणजे चर्चेसाठी सेनेने पुढाकार घ्यावा असे भाजपला अपेक्षित आहे. तसेच सेनेने प्रसार माध्यमातून घेतलेली भूमिका यावर देखील भाजपला तीव्र आक्षेप असल्याचे दिसते. त्यावर मुनगंटीवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली.

Body:शिवसेनेला सत्तास्थापण करण्यासाठी जी पदे अपेक्षित आहेत ती देण्यास भाजप अजिबात उत्सुक नाही. त्यामुळे महायुतीचा तिढा निकालाला आठवडा लोटूनही अजून सुटलेला नाही. सेना मुख्यमंत्री पदाची मागणी करीत असताना भाजप मात्र ही मागणी धुडकावून लावत आहे. त्यामुळेच सेना आपली नाराजी जाहिरपणे व्यक्त करीत आहे. मात्र, या नाराजीवर भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. या माध्यमातून सेनेला गर्भित इशारा देखील दिला जात आहे. भाजपची भूमिका मांडणारे सुधीर मुनगंटीवार यांच्या अनेक वक्तव्यातून हे सूचित होते आहे. एखाद्या पदासाठी चर्चा रोखुन धरणं यापेक्षा संवादाच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवणं हे अधिक महत्त्वाचं आहे असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी निकालाच्या दिवशी सत्तेसाठीची चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मध्यस्तीने होईल असे सूचक वक्तव्य केले होते. उद्धव यांना अमित शाह यांच्याशी चर्चा करावीशी वाटत असेल तर कोणत्याही क्षणी दिल्ली येथे जाऊन चर्चा करता येऊन शकते. उद्धव यांनी सांगितले मी दिल्लीला यायला तयार आहे तर चर्चा सुरू होईल असे मुनगंटीवार म्हणाले. तर सेनेच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून होणाऱ्या टीकेबातही त्यांनी नाराजी व्यक्त केली. सेनेचे नाव न घेता त्यांनी यामुळे सामान्य जनतेच्या मनात पक्षाची विश्वासार्हता कमी होते असेही ते म्हणाले. मेरीटच्या आधारावर होणारी चर्चा आणि राष्ट्रपती राजवट लागण्याच्या त्यांच्या वक्तव्याचाही मुनगंटीवार यांनी खुलासा केला. एकंदरीत भाजपही नमते घ्यायला तयार नाही असेच चित्र सध्या दिसून येत आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.