ETV Bharat / state

पाणीपुरवठा योजनेच्या पाईपखाली दबून एकाचा मृत्यू, आर्थिक मदतीची मागणी - chandrapur latetst news

चिमूर तालुक्यातील खडसंगी येथील कब्रस्तानच्या भिंतीला लागून चिमूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप ठेवण्यात आले होते. त्या पाईपखाली दबून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

म
author img

By

Published : Aug 18, 2021, 8:42 PM IST

Updated : Aug 18, 2021, 10:47 PM IST

चिमूर (चंद्रपूर) - तालुक्यातील खडसंगी येथील कब्रस्तानच्या भिंतीला लागून चिमूर नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेचे पाईप ठेवण्यात आले होते. त्या पाईपखाली दबून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 18 ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे कंत्राटदार कंपनीच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रोश व्यक्त केला असून घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पाणीपुरवठा योजनेच्या पाईपखाली दबून एकाचा मृत्यू

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिमूर नगर परिषदेच्या वाढी 58 कोटी पाणी पुरवठा योजनेसाठी चारगाव तलावाचे पाणी चिमूर येथे येथे आणण्यासाठी पाईप लाईनचे काम सुरू आहे. हे काम एपी अॅण्ड जेपी कंपनीला देण्यात आले आहे. चिमूर-वरोरा मार्गावर मोठ्या प्रमाणात पाईप ठेवण्यात आल्या आहेत. गणेश वाल्मिक नौताम हा शेळी चारण्यासाठी खडसंगी येथील कब्रस्तान परिसरात गेला होता. त्यावेळी पाईप गणेशच्या अंगावर पडले. यात चिरडून त्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा मृतदेह ग्रामस्थ व पोलिसांनी मिळून पाईपखालून काढला आणि शवविच्छेदनासाठी उप जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.

आर्थिक मदतीची मागणी

पाईप ठेवण्याची जागा नसताना या ठिकाणी पाईप ठेवण्यात आले होते. तसेच या ठिकाणी सुरक्षा रक्षक नव्हते व अपघात होऊ नये यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नव्हती. यामुळे या घटनेला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी व मृताच्या नातेवाईकांनी केली आहे.

हेही वाचा - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू; नागपूर महामार्गावरील घटना

Last Updated : Aug 18, 2021, 10:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.