ETV Bharat / state

चॉकलेटचे आमिष दाखवत ३५ वर्षीय नराधमाचा ३ वर्षीय बलिकेवर अत्याचार - chandrapur police news

रामनगर पोलिसांनी आरोपी भीमराव गोंगले विरोधात बलात्कार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास राधिका पवार करीत आहेत.

physical abuse case
physical abuse case
author img

By

Published : Mar 27, 2021, 8:26 PM IST

चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका तीन वर्षीय चिमुकलीवर 35 वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याचे समोर आले. रामनगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे. ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली.

घरी नेऊन अत्याचार

शहरातील दूध डेअरीच्या बाजूला सावरकर नगर आहे. 25 मार्चला सावरकर नगर शासकीय दूध डेअरीजवळ सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी घरी टीव्ही पाहत होती. यावेळी तिची आई आणि बहीण होती आणि दार बंद होते. त्यावेळी शेजारच्या महिलेने दार ठोठावले आणि पीडित बलिकेच्या आईने दार उघडले. यावेळी पीडित बालिका खेळण्यासाठी बाहेर पडली. या वेळी काळाने झडप घातली. आरोपी नराधमाला ही संधी वाटली. त्याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत घरी नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. भीमराव गोंगले असे या नराधमाचे नाव आहे. ही चिमुकली कशीबशी आपल्या घरी आली आणि तिने घडलेली हकीकत कशीबशी सांगितली.

पीडितेच्या आईला धमकी

पीडितेच्या आईने आरोपी 35 वर्षीय भीमराव गोंगलेला जाब विचारला असता त्याने उलट पीडितेच्या आईलाच धमकी दिली. पीडितेचे वडील घरी आल्यावर त्यांनी तत्काळ मुलीला सोबत घेत रामनगर पोलीस स्टेशन गाठले. यावेळी पीडित मुलीच्या आईने नारी शक्ती महिला संघटनेला सोबत घेत भीमराव विरोधात तक्रार दिली. रामनगर पोलिसांनी आरोपी भीमराव गोंगले विरोधात बलात्कार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पुढील तपास राधिका पवार करीत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा चंद्रपूर हादरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.