ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये काल 644 कोरोनामुक्त; 110 नवीन भर, 9 मृत्यू - चंद्रपूर कोरोना रुग्ण 29 मे

चंद्रपूर जिल्ह्यात काल नवीन 110 कोरोना रुग्ण आढळले. तर 9 जणांचा मृत्यू झाला. 644 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

chandrapur
चंद्रपूर
author img

By

Published : May 30, 2021, 3:49 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात काल (29 मे) 644 जणांनी कोरोनावर मात केली. त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर 110 कोरोना रुग्णांची नव्याने भर पडली असून 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या

चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 82 हजार 307 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 77 हजार 633 झाली आहे. सध्या 3 हजार 235 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 4 लाख 68 हजार 701 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 3 लाख 83 हजार 383 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

येथील 9 मृत्यू

काल मृत्यू झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील खुटाळा येथील 54 वर्षीय महिला, समता नगर येथील 75 वर्षीय पुरुष, परसोडी येथील 72 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 38 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, सिंदेवाही तालुक्यातील 70 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 73 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील ताडगाव येथील 58 वर्षीय पुरुष आणि चामोर्शी तालुक्यातील 63 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. असे एकूण 9 मृत्यू काल झाले आहेत.

एकूण मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत 1439 बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 1334, तेलंगणा 2, बुलडाणा 1, गडचिरोली 38, यवतमाळ 48, भंडारा 11, वर्धा 1, गोंदिया 2 आणि नागपूर येथील 2 बाधिताचा समावेश आहे.

काल सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर शहरात

काल नवीन 110 रुग्ण आढळले. यात चंद्रपूर महानगरपालीका क्षेत्रातील 22, चंद्रपूर तालुका 07, बल्लारपूर 15, भद्रावती 02, ब्रम्हपुरी 18, नागभिड 1, सिंदेवाही 03, मूल 07, सावली 01, गोंडपिपरी 02, राजूरा 11, चिमूर 04, वरोरा 04, कोरपना 12 आणि इतर ठिकाणच्या 1 रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

'नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला आहे. या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर करावा. वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी. तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे', असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा - अभिनेत्रीचा लस घेण्यासाठी कारनामा; फ्रंटलाईन वर्करचे खोटे ओळखपत्र बनवून घेतला डोस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.