ETV Bharat / state

मुंबईहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह; कुटुंबातील चार सदस्यांच्या अहवालाची प्रतीक्षा - chandrapur covid 19 hospital

मुंबईहून चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 1 जूनला हा व्यक्ती जुनोना मार्गावरील शिवाजीनगर येथील आपल्या घरी आला होता.

chandrapur covid 19
मुंबईहून आलेला रुग्ण पॉझिटिव्ह; कुटुंबातील चार सदस्यांच्या अहवालाची प्रतीक्षा
author img

By

Published : Jun 3, 2020, 2:58 PM IST

चंद्रपूर - मुंबईहून चंद्रपूर शहरात दाखल झालेल्या एका 37 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 1 जूनला हा व्यक्ती जुनोना मार्गावरील शिवाजीनगर येथील आपल्या घरी आला होता. ३१ मे रोजी मुंबईवरून निघालेला हा व्यक्ती १ जून रोजी चंद्रपूरला पोहचला. जुनोना रोड शिवाजी नगर चंद्रपूर येथील या व्यक्तीने दुपारी लक्षणे आढळल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात संपर्क केला. या ठिकाणी कोविड आयसोलेशन वार्डमध्ये त्याला दाखल करण्यात आले. १ जूनला सायंकाळी स्वॅब घेण्यात आले.

व्यक्तीचा २ जूनला रात्री उशिरा अहवाल पॉझिटीव्ह आला. ही व्यक्ती मुंबईवरून आल्यानंतर काही वेळ घरी गेली होती. त्यामुळे कुटुंबातील आई-वडिल, पत्नी, मुलगी यांचाही स्वॅब घेण्यात येणार आहे. चंद्रपूरमध्ये आतापर्यंत २ मे (एक रुग्ण), १३ मे ( एक रूग्ण) २० मे ( एकूण १० रूग्ण ) २३ मे ( एकूण ७ रूग्ण ) आणि २४ मे रोजी ( एकूण रूग्ण २ ) २५ मे रोजी ( एक रूग्ण ) ३१ मे रोजी ( एक रुग्ण ) २ जून रोजी ( एक रूग्ण ) अशा प्रकारे जिल्ह्यातील रुग्ण २४ झाले आहेत. आतापर्यंत २० रुग्ण बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे २४ पैकी अ‌ॅक्टिव्ह रुग्णाची संख्या आता ४ झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.