चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1 हजार 27 झाली आहे. दुर्गापुर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोना रुग्णांचे क्रेंद झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे दिसून आल्यास तत्काळ अँटीजेन चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासांत 39 बाधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची संख्या 1 हजार 27 वर पोहोचली आहे. यापैकी 609 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 409 बाधितांवर उपचार सुरू आहेत. नव्याने आढळेलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर 17, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस 5, गडचांदूर 2, बल्लारपूर 6, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एक, राजुरा दोन तर वरोरा येथील तीन, असे एकुण 39 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर शहरातील पोलीस कॉर्टर तुकुम परिसरातील तीन, सीटीपीएस रोड परिसरातील एक, कोंडी वार्ड नंबर 5 येथील दोन, दडमल वार्ड सोमेश्वर मंदिर परिसरातील तीन, जटपुरा गेट परिसरातील एक, बालाजी वॉर्ड नंबर 2 येथील दोन, वेटर्नरी वार्ड येथील दोन, इंदिरानगर येथील एक, चोर खिडकी येथील एक, जगन्नाथ बाबा नगर परिसरातील एक, पठाणपुरा परिसरातील एक बाधित, रुग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूर तालुक्यातील घुगुस येथे 5 बाधित आढळले आहेत. गडचांदूर येथील दोन पॉझिटिव्ह ठरले आहे. विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोन, गोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपूर शहरात एक पॉझिटिव्ह आढळला आहे. पोंभुर्णा 1, गोंडपिपरी 1, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील 1, सावली तालुक्यातील हिरापूर येथील 1, राजुरा येथील कर्नल चौक परिसरातील 1, आंबेडकर वार्ड राजुरा येथे 1 बाधित आढळले आहेत.
वरोरा तालुक्यातील बोर्डा येथे एक तर वरोरा शहरात दोन बाधितांची नोंद झाली. जिल्ह्यात 18 हजार 391 नागरिकांची अँटीजेन तपासणी केलेली आहे. यापैकी 207 पॉझिटिव्ह असून 17 हजार 184 निगेटिव्ह आहेत.
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेद्वारे अँटीजेन चाचणी केंद्र जटपुरा वार्ड येथील सरदार वल्लभभाई पटेल शाळा, पंचमुखी हनुमान मंदिराजवळ सुरु केले आहे. चाचणी करण्याची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत उपलब्ध आहे. केंद्रांमध्ये दररोज 125 ते 200 चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोना चाचण्याचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी केवळ 15 ते 30 मिनिटाचा असतो. त्यामुळे निदान व उपचार करण्याची प्रक्रिया सोयीस्कर झाली आहे.