ETV Bharat / state

Plastic Waste Free City : आता प्लास्टिकचा कचरा जाळीत अडकणार; चंद्रपूरच्या स्वच्छतेसाठी जेसीआय सरसावले - प्लास्टिकची विल्हेवाट

नाल्या तुंबने, सांडपाणी बाहेर येणे, त्याचे संकलन करणे या सर्वात मोठ्या समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूरच्या जेसीआय ओर्बीटने पुढाकार घेतला आहे. ( jci innovative project to plastic waste free city ) नाली आणि नाल्यातून निघणाऱ्या सांडपाण्यासह जे प्लास्टिक आणि इतर कचरा निघतो तो जाळीत अडकला जाणार आहे.

Plastic Waste Free City
चंद्रपूरच्या स्वच्छतेसाठी जेसीआय सरसावले
author img

By

Published : Jun 6, 2022, 1:09 PM IST

चंद्रपूर - प्लास्टिकची विल्हेवाट ही कुठल्याही यंत्रणेसाठी मोठी डोकेदुखी आहे. नाल्या तुंबने, सांडपाणी बाहेर येणे, त्याचे संकलन करणे या सर्वात मोठ्या समस्या आहेत. त्याचे निराकरण करण्यासाठी चंद्रपूरच्या जेसीआय ओर्बीटने पुढाकार घेतला आहे. ( jci innovative project to plastic waste free city ) नाली आणि नाल्यातून निघणाऱ्या सांडपाण्यासह जे प्लास्टिक आणि इतर कचरा निघतो तो जाळीत अडकला जाणार आहे. कारण अशा ठिकाणी जाळ्या लावण्याचा अभिनव उपक्रम जेसीआयने चंद्रपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

चंद्रपूरच्या जेसीआय ओर्बीट

चंद्रपूर स्वच्छ ठेवण्यासाठी होणार मोठी मदत - महानगरपालिकेचे उपायुक्त विपीन पालिवाल यांच्या हस्ते या उपक्रमाचे उदघाट्न करण्यात आले. यावेळी जेसीआय चंद्रपूर ओर्बीटचे अध्यक्ष हरीश मुथा, सचिव अमित पोरेड्डीवार, माजी अध्यक्ष हितेश नथवानी, मार्गदर्शक मनीष तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. झरपट नदीवरील नाल्याच्या मुखावर ही जाळी लावण्यात आली असून ती प्रायोगिक तत्वावर आहे. पावसाळा ऋतू गेल्यावर शहरातील इतर ठिकाणी असलेल्या नाल्यावर ही जाळी लावण्यात येणार आहे. या जाळ्यातील कचऱ्याची मनपाद्वारे नियमित सफाई करण्यात येणार आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर स्वच्छ होण्यास मोठी मदत मिळणार आहे. उपायुक्त विपीन पालिवाल यांनी जेसीआयच्या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून यासाठी हवे ते सर्व सहकार्य महापालिकेकडून करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प निर्देशक जेसी अनुपम भगत, जेसी हरप्रीत गोत्रा, जेसी आकाशदीप ढोबले, जेसी विशाल मुथा, जेसी महेंद्र जोगी, जेसी गौरव रेगुड़वार, जेसी पंकज नागरकर, जेसी शोभा मुथा, जेसी भारती मुथा, जेसी नयना भगत, जेसी मीनाक्षी जोगी यांनी प्रयत्न केले.

Plastic Waste Free City
चंद्रपूरच्या स्वच्छतेसाठी जेसीआय सरसावले

हेही वाचा - अंबानींच्या होणाऱ्या सुनेचे भरतनाट्यम पाहून सर्वच झाले घायाळ, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.