ETV Bharat / state

खासगी रुग्णालयातील काळाबाजार रोखण्यासाठी पथके तयार करण्याचे खासदार धानोरकरांचे आदेश

माध्यम, तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडिसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मोफत मिळत असले तरी खासगी रुग्णालये आणि औषध दुकानांत अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना ते अन्य ठिकाणाहून आणण्यास सांगितले जाते. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा काळाबाजार केला जात असल्याने नातेवाईकांना हे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. ही लूट थाबिण्यासाठी पथक स्थापन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

mp dhanorkar orders to form squads to curb black market in private hospitals
खासदार धानोरकर
author img

By

Published : Oct 17, 2020, 9:44 PM IST

चंद्रपूर - कोविड १९ रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेले रेमडिसिवीरचे इंजेक्शन व पीपीई सरकारने निर्धारित केले आहेत. निश्चित दरातच सर्वत्र उपलब्ध करून देण्यात येत असून ही बाब खासगी रुग्णालयांना बंधनकारक आहे. काळाबाजार रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर विशेष पथके निर्माण करून लूट थांबविण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, महानगर पालिका आयुक्त यांना केल्या.

आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयासाठी रेमडिसिवीरच्या १०० मिलिग्रॅम इंजेक्शनच्या एक कुपीची किंमत २३६० रुपये व पीपीई किटचे १० दिवसाचे ४५०० रुपये याप्रमाणे दर निश्चित केली असून, प्रत्येक जिल्ह्यात नेमून दिलेल्या औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या. या औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा पद्धती निर्माण करण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

माध्यम, तीव्र लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना दिले जाणारे रेमडिसिवीर इंजेक्शन सरकारी रुग्णालयात मोफत मिळत असले तरी खासगी रुग्णालये आणि औषध दुकानांत अव्वाच्या-सव्वा दर आकारले जात आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांना ते अन्य ठिकाणाहून आणण्यास सांगितले जाते. मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने याचा काळाबाजार केला जात असल्याने नातेवाईकांना हे मिळविण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. ही लूट थाबिण्यासाठी पथक स्थापन करण्याच्या सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.

असे होईल रेमडीसिवीर इंजेक्शन उपलब्ध

रुग्णांसाठी रेमडिसिवीरची आवश्यकता असल्यास खासगी रुग्णालयांनी शहरातील आरोग्य किंवा वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक राहील. यात इंजेक्शनची चिट्ठी, रुग्णाच्या कोरोना अहवाल, आधार किंवा इतर फोटो असलेल्या प्रमाणपत्र, रुग्णाची वैद्यकीय माहिती द्यावी लागणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.