ETV Bharat / state

ईटीव्ही भारत इम्पॅक्ट; हातठेला संशोधकांची खासदार धानोरकरांकडून दखल; म्हणाले काहीही कमी पडू देणार नाही - हातठेला संशोधकांची खासदार धानोरकरांकडून दखल

तब्बल दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हातठेल्याचे जागतिक पातळीचे पेटंट प्रा. येनारकर ( handcart made by Yogesh Yenarkar ) यांना मिळाले. याची बातमी ईटीव्ही भारतमध्ये 22 जानेवारीला प्रकाशित झाली. या वृत्ताची दखल खासदार बाळू धानोरकरांनी घेत थेट प्रा. येनारकर यांच्याशी संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या ( MP Balu Dhanorkar meet Yogesh Yenarkar ) आहेत. त्यांनी येनारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आणि त्यांचे सहकारी अमित मुत्यालवार यांचा सत्कार केला.

हातठेला संशोधकांची खासदार धानोरकरांकडून दखल

author img

By

Published : Jan 24, 2022, 8:35 PM IST

चंद्रपूर - हातठेला चालविणाऱ्या श्रमिकांचे कष्ट कमी करण्यासाठी प्रा. योगेश येनारकर ( handcart made by Yogesh Yenarkar ) यांनी नाविन्यपूर्ण आणि आधुनिक असा हातठेला तयार केला आहे. नुकतेच जागतिक पातळीचे पेटंट हातठेल्याकरिता मिळाले आहे. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले असता याची दखल काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकरांनी ( MP Balu Dhanorkar meet Yogesh Yenarkar ) घेतली. धानोरकरांनी आवर्जून प्रा. येनारकर यांच्या घरी जाऊन सदिच्छा भेट दिली. त्यांनी केलेले काम समजून घेतले. यासाठी हवी ती मदत करण्याची तयारी दर्शवत त्यांच्या कार्याचे भरभरून कौतुक केले.

असंघटित श्रमिक वर्ग हा सहसा दुर्लक्षित समजला जातो. त्यांच्याकडून वापरला जाणारा हातठेलादेखील पारंपरिक पद्धतीने तयार होतो. हातठेवला आजच्या युगात सोयीस्कर नाही, हे प्रा. येनारकर यांनी हेरले. आपल्या सहकारी विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांनी नाविन्यपूर्ण असा हातठेला तयार केला. यात सोयीनुसार ब्रेक, हॉर्न, स्टेअरिंग, इंडिकेटर, पायडल अशा सर्व गोष्टी त्यात समाविष्ट केल्या आहेत. याच्या वापरामुळे श्रमिक वर्गाचा वेळ आणि कष्ट वाचणार आहे.

हातठेला संशोधकांची खासदार धानोरकरांकडून दखल

हेही वाचा-Nana Patole on Why I Killed Gandhi: 'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणावी- नाना पटोले

चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर उंचावले-

तब्बल दहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर हातठेल्याचे जागतिक पातळीचे पेटंट प्रा. येनारकर ( Patent for Hand Cart invention in Chandrapur ) यांना मिळाले. याची बातमी ईटीव्ही भारतमध्ये 22 जानेवारीला प्रकाशित झाली. या वृत्ताची दखल खासदार बाळू धानोरकरांनी घेत थेट प्रा. येनारकर यांच्याशी संपर्क करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी येनारकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचा आणि त्यांचे सहकारी अमित मुत्यालवार यांचा सत्कार केला. चंद्रपूरचे नाव जागतिक पातळीवर उंचावले याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला अभिमान असल्याचे ते यावेळी म्हणाले. श्रमिकांच्या समस्यांकडे आजवर कोणी लक्ष दिले नाही. मात्र, नाविन्यपूर्ण प्रयोगामुळे श्रमिकांचे श्रम कमी होणार, असेही धानोरकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा-Devendra Fadnavis on Thackeray: बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले, असे तुमचे म्हणणे आहे का ? फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल

आपल्याला हवी ती मदत करेल
या पेटंटमुळे चंद्रपुरचे नाव जागतिक पातळीवर गेले आहे. आता अशा पद्धतीचे उत्पादन व्यापक पातळीवर होणे आवश्यक आहे. यासाठी कुठले उद्योगपती, कंपनी, केंद्र सरकार-राज्य सरकारच्या संबंधित ज्या कुठल्या सहकार्याची अपेक्षा आहे, ही सर्व मदत एक खासदार म्हणून आपण करणार असल्याचे आश्वासन यावेळी धानोरकरांनी प्रा. येनारकरांना दिले. तसेच वैयक्तिक पातळीवरदेखील हवे ते सर्व सहकार्य करण्याची तयारी त्यांनी ( MP Balu Dhanorkar on patent hand cart ) दर्शविली.

हेही वाचा-Bombay HC to MH government : कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मदत का नाही; मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

चंद्रपुरात उद्योग तयार व्हावा
हातठेल्याच्या नाविन्यपूर्ण पेटंटमूळे चंद्रपुरचे नाव मोठे झाले आहे. त्यामुळे भविष्यात याचे उत्पादनदेखील चंद्रपुरातच व्हायला हवे, असा आग्रह खासदार धानोरकरांनी धरला. जिल्ह्या हा औद्योगिक संपदेने नटलेला आहे. त्यामुळे उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या कुठल्याही गोष्टी कमी पडणार नाहीत. यासाठी हवा तेवढा मोठा उद्योग उभारण्यास आपण मदत करणार आहोत. यामुळे स्थानिक रोजगार निर्मितीस मोठी चालना मिळेल, असेही धानोरकर यावेळी म्हणाले.

हेही वाचा-Genome Sequencing Analysis : मुंबईतील एकूण चाचण्यांपैकी ८९% ओमायक्रॉनबाधित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.