ETV Bharat / state

'अहमद पटेल यांच्या निधनाने एका अभ्यासू, बुद्धीमान अन् परखड नेतृत्वास देश मुकला' - congress leader Ahmed Patel news

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेल यांच्या निधनाने एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मंत्री विजय वडेट्टीवार
मंत्री विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Nov 26, 2020, 3:57 AM IST

चंद्रपूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. “पटेल यांच्या निधनाने एक विद्वान राजकारणी आणि एका अभ्यासू, बुद्धीमान व परखड नेतृत्वास देश मुकला आहे, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अहमद पटेल यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना वडेट्टीवार म्हणाले की, अहमद पटेल यांच्या निधनाने देशाचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. अहमद पटेल यांनी देशाची अविरतपणे आणि निस्वार्थी हेतूने सेवा केली आहे. त्यांनी समाजाची सेवा करत सार्वजनिक आयुष्यात अनेक वर्षे घालवली. कुशाग्र बुद्धिमत्ता आणि काँग्रेसला सक्षम करण्यातील त्यांची भूमिका यांमुळे ते नेहमीच लक्षात राहतील. अहमद पटेल हे साधे गृहस्थ नसून, ते एक विद्वान राजकारणी होते. सर्वांत कठीण काळात ते पक्षासोबत उभे राहिले होते. मृदूभाषी, व्यवहार चतूर आणि नेहमी हसतमुख राहणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. अतिशय शांत, कुशाग्र आणि तीव्र राजकीय भान असलेले नेते होते. त्यांचे जाणे हे पक्षासाठी नुकसान करणारे आहे. पक्षाच्या प्रत्येक निर्णयात त्यांचा सहभाग होता. पक्षासाठी त्यांनी केलेले काम अत्यंत प्रशंसनीय आहे. जेव्हा कुणाला पक्षात त्यांच्या मदतीची गरज भासायची त्यावेळी त्यांच्या मदतीला धावून यायचे. पक्ष त्यांचे योगदान विसरू शकणार नाही.

80 च्या दशकात अहमद पटेल भरूच इथून तीन वेळा लोकसभा खासदार म्हणून निवडून गेले होते. त्याच दरम्यान 1984 साली ते दिल्लीत पक्षाचे संयुक्त सचिव म्हणून पोहोचले. त्यानंतर ते तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांचे संसदीय सचिव बनले. 1986 साली अहमद पटेल यांना गुजरात काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्यात आले. 1988 साली ते गांधी-नेहरू कुटुंबाद्वारे चालविल्या जाणाऱ्या जवाहर भवन ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. हळूहळू अहमद पटेल हे गांधी-नेहरू कुटुंबाच्या जवळचे म्हणून ओळखले जाऊ लागले. राजीव गांधी यांचा त्यांच्यावर जेवढा विश्वास होता, तेवढाच विश्वास सोनियांचाही अहमद पटेल यांच्यावर होता. यावरून त्यांच्यातील नेतृत्वगुणांची कल्पना येऊ शकते. दोन दशके राजकारणात आपला अढळ स्थान निर्माण करणाऱ्या पटेल यांना राजकारणाच्या खाच खळग्यांची उत्तम जाण, पक्षातील घडामोडींचा गाढा अभ्यास याच गुणांमुळे त्यांचे भारताच्या राजकारणातील स्थान अढळ आहे. अहमद पटेल यांच्या जाण्यामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरुन निघणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा - नोकरभरतीवरील स्थगिती उठवून ओबीसींचा अनुशेष भरणार - मंत्री विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.