ETV Bharat / state

लाॅकडाऊन: तेलंगणाने हाकलले... महाराष्ट्राने सावरले - तेलंगणात कामगार

लॉकडाऊन देशात कायम असले तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले. तेलंगणा सरकारने या मजुरांना जाण्याची परवानगी तर दिली. मात्र, वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही.

migrants-workers-came-from-telngana-to-maharastra

author img

By

Published : May 4, 2020, 10:20 AM IST

राजूरा (चंद्रपूर)- परराज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी केंद्र शाससाने परवानगी दिली. तेलंगणात अडकलेल्या हजारो महाराष्ट्रातील मजुरांना तेलंगणाने सीमावर्ती भागातील पोडसा गावात पोहोचवले. मात्र, याची माहिती त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिली नाही. त्यामुळे अचानक आलेल्या मजुरांच्या लोंढ्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. मात्र, या मजुरांच्या मदतीसाठी महाराष्ट्र सरकार धावून गेले.

तेलंगणाने हाकलले... महाराष्ट्राने सावरले

हेही वाचा- देशात ४० हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; मागील २४ तासांत २ हजार ४८७ रुग्णांची नोंद

पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार धानोरकर, आमदार धोटे यांनी तत्काळ ट्रॅव्हल्सची व्यवस्था केली. आज सकाळी त्यांना गावी पोहचविण्यात आले. पण अद्यापही हजारो मजूर गावाकडे पोहोचण्यासाठी आतूर आहेत. शेतातच डेरा टाकून ते स्वयंयपाक बनवित आहेत.

देशात लॉकडाऊन कायम असला तरी परराज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी शिथिलता देण्यात आली. यामुळे तेलंगणात अडकलेले महाराष्ट्रातील सुमारे चार हजार मजूर रविवारी चंद्रपूर जिल्ह्यात पोडसा सीमेवर आले. तेलंगणा सरकारने या मजुरांना जाण्याची परवानगी तर दिली. मात्र, वाहनांची कोणतीही व्यवस्था केली नाही. त्यामुळे पदरचे पैसे खर्च करुन या मजुरांनी भाड्याने वाहने केली आणि सीमेपर्यंत आले. गोंडपिंपरी तालुक्यातील पोडसा पुलावरुन हे सर्व मजूर आज महाराष्ट्रात म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दाखल झाले.

मिरची तोड करण्यासाठी तेलंगणात हजारो मजूर दरवर्षी जातात. पण यावेळी कोरोना संकटामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले. या लोकांना गावाबाहेर राहावे लागले. लहान-लहान मुले घेऊन या लोकांनी दीड महिना तेलंगणातच राहावे लागले. आता आपल्या राज्यात परतल्यावरही त्यांच्या यातना कमी होताना दिसत नाही. उन्हात हे लोक डोक्यावर ओझं आणि खांद्यावर मुलांना घेऊन पायदळ आपल्या गावाकडे निघाले आहेत. उन्हापासून बचावासाठी झाडाखाली, रस्त्यावरच्या बसस्थानकात आश्रयाला आहेत. असे अनेक मजूर-कामगार तेलंगणातून महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले असून, सीमेवर मदतीची वाट बघत आहेत.

राज्यातील सुमारे 25 हजार मजूर तेलंगणात गेलेले आहेत. आपल्यापरीने ते येत आहेत.अशातच आज पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर,राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचा ताफा दुपारनंतर पोडसा सीमेवर धडकला. राज्याच्या सीमेवर जमलेल्या गर्दीचे त्यांनी सांत्वन केले. अखेर जमलेल्या मजुरांना स्वगृही परतण्यासाठी मदत करणार असल्याचे पालकमंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. प्रशासनाला प्रत्तेक मजुरांची जेवणाची व्यवस्था देखील करण्याचे आदेश दिले.

काँग्रेसचे कार्यकर्ते मदतीला धावले..

लक्कडकोट आणि पोडसा हे दोन्ही श्रेत्र राजुरा विधानसभा श्रेत्रात येतात. तेलंगणातील मजूर या श्रेत्रात मोठ्या प्रमाणात येत असल्याची माहीती मिळताच श्रेत्राचे आमदार सुभाष धोटे यांनी भ्रमणध्वनीव्दारे कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. मजुरांची योग्य व्यवस्था करण्याचा सूचना आमदार धोटे यांनी केल्या. सूचना मिळताच काँग्रेसचा कार्यकर्त्यांनी पोडसा सिमेवर धाव घेतली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.