ETV Bharat / state

Methane Gas : चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात आढळले मिथेनचे साठे; शासनाच्या सर्व्हेक्षणात आलं समोर - भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे

Methane Gas: नैसर्गिक वायूंचे साठे समुद्रातच आढळत होते. परंतु पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने येथे २०१६-२०१७ मध्ये सर्वेक्षण केले आणि चक्क चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारशा गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यात मिथेनचे साठे सापडले (Methane Gas Found In Chandrapur)आहेत.

Methane Gas
मिथेनचे साठे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 10:36 PM IST

Updated : Oct 12, 2023, 10:57 PM IST

चंद्रपूर : Methane Gas : एरवी समुद्राच्या तळाशी आढळणारे नैसर्गिक वायूचे साठे आता चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा (Methane Gas Found In Chandrapur)आढळून आले आहेत. केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने या जिल्ह्यात २०१६-२०१७ मध्ये सर्वेक्षण केले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्यातील भूगर्भात ३३१ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात ३७ तर सिरोंचा ब्लॉकमध्ये ७०९ वर्ग कि.मी. परिसरात ४७ दशलक्ष कोटी क्युबिक मीटर एवढे मोठे कोल बेडेड मिथेनचे साठे सापडले आहेत, अशी माहिती भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे (Astronomer Suresh Chopane) यांनी दिली.

चंद्रपूर-गडचिरोलीत सर्वेक्षण : शासनाने यापूर्वी १९९६-९८ मध्ये चंद्रपूर- गडचिरोली जिल्ह्यात या अनुषंगाने सर्वेक्षण केलं होतं. परंतु, प्रगत तंत्रज्ञानाच्या अभावामुळे नैगर्सिग वायूचे साठे शोधण्यात अडचणी आल्या. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये या दोन्ही जिल्ह्यातील कोल बेड मिथेन (सीबीएम) च्या साठ्यांकडं शासनाचं लक्ष गेलं. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सर्वेक्षण करण्यात आलं. यात नैसर्गिक वायूचे साठे असल्याचं समोर आलं आहे. चंद्रपूरचा ब्लॉक पूर्व विदर्भातील प्राणहिता - गोदावरी बेसिनमध्ये समावेश आहे. या श्रेणी-३ मध्ये येणाऱ्या बेसिनचे सविस्तर संशोधन केल्यानंतर येथे हे साठे आढळले.

सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण : चंद्रपूर व्यावसायिक ब्लॉक ३३१ वर्ग किलोमीटर भूभागाचा आहे. यात ३७ अरब क्यूबिक मीटर एवढे साठे आहेत तर सिरोंचा ब्लॉक हा ७०९ वर्ग किलोमीटरचा असून त्यात ४७ अरब क्युबिक मीटरचे साठे आहेत. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन सोबत या ब्लॉक संदर्भात गेल, लॉयड आणि सोलार ग्रुपची बैठक आणि सादरीकरण झाले होते. पण, पर्यावरण आणि वन कायद्याच्या अडचणीमुळे अजूनही कुण्या कंपनीने हा ब्लॉक घेतला नाही. तरी पुढील संशोधन आणि लिलावा मध्ये हा ब्लॉक घेतला जाण्याची शक्यता अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे.

इतके साठे आढळले : विदर्भ-तेलंगानात प्राणहिता गोदावरी बेसिन विदर्भ आणि तेलंगाना राज्यात प्राणहिता-गोदावरी हे स्तरित खडकाचे संपूर्ण बेसिन ३०,००० वर्ग/किमीच्या अधिक परिसरात व्यापले आहे. त्याची लांबी जवळ जवळ ४०० तर रुंदी १०० किमी असून या भूभागात भूपट्टीदृष्ट्या नागपूर, चंद्रपूर, सिरोंचा, तेलंगाना मधील अस्वरापेटा हे चार भाग पाडण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्रात व्यावसायिकदृष्ट्या २ तर तेलंगनात ३ ब्लॉक्स पाडण्यात आले आहेत. विदर्भात कोल बेडेड मिथेनचं ८४ अरब क्यूबिक मीटर (९४.४ मिलियन मेट्रिक टन) इतके साठे आढळले आहेत. यातील नागपूर ब्लॉकमध्ये अल्प साठे असले तरी व्यावसायिकदृष्ट्या त्याला अजून मान्यता मिळाली नाही.

मिथेनच्या साठ्यासाठी केला होता सर्व्हे : चंद्रपूर ब्लॉकमध्ये चंद्रपूर, बल्लारशा, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती आणि वरोरा तालुक्याचा आणि तेलंगणाच्या उत्तर आदिलाबाद तालुक्याचा समावेश होतो. येथे १९९६-९८ साली सर्वे झाला होता. परंतु मिथेनच्या साठ्यासाठी २०१६-१७ ते २०२२ पर्यंत विमानाच्या साहाय्याने सुद्धा सर्व्हे केला गेला. यात २/३ डी सिस्मिक सर्वे, जिओ सायंटीफिक सर्व्हे, ग्रॅवीटी अंड मँग्नेटीक सर्वे आणि ड्रील या वैज्ञानिक पद्धतीने हा सर्वे केला गेला. चंद्रपूर ब्लॉक घेण्याची तयारी ओएनजीसी तेल कंपनीने इच्छा व्यक्त केली आहे अशी माहिती भूगर्भ अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. Pimpri Chinchwad fire : पिंपरी-चिंचवडमध्ये एकापाठोपाठ स्फोट, चार स्कूल बस जळून खाक
  2. Bahadurgarh Gas Leak : कारखान्यात मिथेन गॅस गळतीमुळे चार कामगारांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक
  3. Gas cylinder truck fire: गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग...बॉम्बप्रमाणे झाला स्फोट, पहा व्हिडिओ

माहिती देताना अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे

Last Updated : Oct 12, 2023, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.