ETV Bharat / state

Maya Tigress : ताडोबाची राणी 'माया वाघिणी'चा शोध घेण्यासाठी व्यवस्थापन कामाला; 125 ट्रॅप कॅमेऱ्यानं ठेवणार नजर

Maya Tigress : ताडोबा (Tadoba) व्याघ्र प्रकल्पाच्या (Tiger Project) पर्यटनाला 1 ऑक्टोबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचं सर्वात मोठं आकर्षण समजली जाणारी 'माया वाघीण' अजूनही पर्यटकांच्या नजरेस पडलेली (Maya Tigress Gone Missing) नाही. त्यामुळं अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलंय.

Maya Tigress Gone missing
ताडोबाची राणी माया वाघिण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 10, 2023, 8:43 PM IST

चंद्रपूर Maya Tigress : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची राणी अशी ओळख असणारी माया वाघीण गेल्या अनेक दिवसांपासून दिसेनासी (Maya Tigress Gone Missing) झाली आहे. याबाबत पर्यटक आणि वन्यजीवप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या वाघिणीचा शोध घेण्यासाठी ताडोबा व्यवस्थापनाने 125 ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. मात्र अद्याप 'माया वाघीण' ही कॅमेऱ्यात कैद झालेली नाही. मात्र बरेचदा वाघीण आपले क्षेत्र बदलत असते. त्यामुळे मायाने आपले क्षेत्र बदलले की काय यावर देखील चर्चा सुरू झाली आहे.

कोण आहे माया : 'माया वाघीण' ही अत्यंत रुबाबदार अशी वाघीण आहे. तिची अदा आणि तिची एक झलक पाहण्यासाठी पर्यटक वारंवार ताडोबाची वारी करतात. एकदा शिकार मिळण्यासाठी वाघाला अनेकदा प्रयत्न करावे लागतात. मात्र माया वाघीणीला अपवादात्मक असे कौशल्य प्राप्त आहे. शिकार करण्याची अपवादात्मक कला, अत्यंत चाणाक्ष आणि आक्रमक स्वभाव यामुळेच तिला ताडोबावर राज्य करणारी ताडोबाची राणी संबोधले जाते. माया ही यापूर्वी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या 'माधुरी' या वाघीणीची मुलगी आहे. 2010 मध्ये तिचा जन्म झाला. शिकार करण्याचे बाळकडू मायाला आई माधुरी कडूनच मिळाले. माया ही केवळ ताडोबाची राणी म्हणूनच नव्हे तर, एक चांगली आई म्हणून देखील ओळखली जाते. आपल्या बचड्यांचा अत्यंत काळजीने ती सांभाळ करते. आपल्या बचड्यांशी खेळताना, त्यांच्यावर लक्ष ठेवताना, त्यांना आवाज देताना असे अनेक व्हीडिओ माया वाघीणीचे व्हायरल झाले आहेत. म्हणून समाजमाध्यमात मायाची क्रेझ आहे. 'छोटी तारा' या प्रसिद्ध वाघीणीसोबत मायाची अनेकदा झुंज झाली आहे. मात्र नेहमी मायाने तिला पिटाळून लावले आहे.

शेवटची कधी दिसली माया : माया वाघीणीचे सातत्याने दर्शन हे होत असायचे. मे महिन्यात ती एका दुसऱ्या वाघाबरोबर समागम करताना दिसली. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोअर क्षेत्रातील पांढरपौणि येथील तलावाजवळ ती सातत्याने दिसत होती. मात्र पावसाळ्यात ताडोबा सफारी नेहमीप्रमाणे बंद करण्यात आली आणि त्यानंतर तिचे दिसणे बंद झाले. या दरम्यान जंगलात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गस्त घालण्यात देखील मोठ्या अडचणी येत असतात. मायाचे शेवटचे दर्शन हे 23 ऑगस्टला झाले होते. यानंतर ती दिसली नाही.

गर्भवती असण्याची शक्यता : मे महिन्यात माया एका दुसऱ्या वाघाच्या सहवासात होती. सात ते आठ दिवस तिचा हा समागम सुरू होता. या दरम्यान ती गर्भवती असण्याची शक्यता ताडोबातील काही अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. जेव्हा वाघीण ही गर्भवती होते त्यावेळी ती असे ठिकाण शोधते जिथे सहज शिकार मिळू शकेल, दुसऱ्या वाघांचे वास्तव्य तिथे नसेल, शिकार आणि पाणी सहज उपलब्ध व्हावे. अशावेळी काही महिने वाघीण दिसेनाशी होते. यापूर्वीचा मायाचा सहवास बघता ते गर्भवती असून प्रसूतीसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे, त्याची पुष्टी होण्यासाठी आणखी 15 ते 20 दिवसांचा कालावधी जाणे आवश्यक आहे, यानंतर ती आपल्या बचड्यांना घेऊन बाहेर फिरताना दिसण्याची शक्यता आहे.

मायासाठी 125 ट्रॅप कॅमेरे : माया नेमकी कुठे आहे हे शोधण्यासाठी 125 ट्रॅप कॅमेरे ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. हे कॅमेरे पुढे कुठलीही हालचाल झाल्यास फोटो घेतात. या कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे. सोबत गस्त देखील घालण्यात येते आहे.

मायाचा आक्रमक स्वभाव : मात्र माया ही वाघीण अत्यंत आक्रमक असून तिला कुठलाही मागमूस लागल्यास ती आक्रमक होऊन हल्ला करण्याचा प्रयत्न करते. ताडोबा व्यवस्थापनाला यापूर्वी असे अनेक अनुभव आले आहेत, त्यामुळे गस्त घालताना मोठी सावधानता बाळगली जात आहे.

शोध सुरू आहे, लवकरच समजेल : 'माया वाघीण' ही अचानक गायब झाली असं काही नाही. मुळात पावसाळ्यात ताडोबा कोअर क्षेत्र हे पर्यटनासाठी पुर्णतः बंद असते, या क्षेत्रात मायाचे आकर्षक आहे. 1 ऑक्टोबरपासून ही सफारी पुन्हा सुरू करण्यात आली. यादरम्यान माया दिसली नाही. तर मायाचा शोध सुरू आहे, यासाठी काही वेळ देण्याची गरज आहे, नेमकी काय स्थिती आहे ती येत्या काही दिवसांत समजेल अशी प्रतिक्रिया, ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे प्रकल्प संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली.

125 ट्रॅप कॅमेरे लावून निगराणी : सध्या 125 ट्रॅप कॅमेरे लावून त्याची चाचपणी नियमित सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गस्त घालण्यात अडचण येत आहे. त्यातही मायाचा स्वभाव हा आक्रमक असल्याने विशेष काळजी घ्यावी लागत आहे. मे महिन्यात ती एका वाघासोबत असल्याने ती गर्भवती असक्याची शक्यता अधिक आहे. मात्र, यावर व्यवस्थापन नजर ठेवून आहे अशी प्रतिक्रिया ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पचे उपसंचालक (कोअर) नंदकिशोर काळे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. Tadoba Tigress Injured : माया वाघीण आढळली जखमी अवस्थेत; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात झाले दृश्य कैद
  2. Maya tigress in Tadoba : मायाच्या बछड्याची पर्यटकांना भुरळ; सुप्रिया सुळेंनी देखील केला व्हिडिओ शेअर
  3. Tiger And Leopard Caught चंद्रपुरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघासह बिबट्याला आज वनविभागाने केले जेरबंद, एका वाघिणीचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.