ETV Bharat / state

वडिलांचे घर जाळून तरुणाने विष घेतले; चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील घटना - chandrapur crime news

आसन खुर्द येथे आज शनिवारी मुलाने आपल्या वडिलांचे घर जाळून स्वतः विष घेतल्याची घटना घडली. रामा मारोती पेंदोर (30) असे मारहाण केलेल्या मुलाचे नाव आहे.

man took poison by burning his fathers house in korpana taluka of chandrapur
वडिलांचे घर जाळून तरुणाने विष घेतले; चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यातील घटना
author img

By

Published : Feb 28, 2021, 9:27 AM IST

चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील आसन खुर्द येथे आज शनिवारी मुलाने आपल्या वडिलांचे घर जाळून स्वतः विष घेतल्याची घटना घडली. रामा मारोती पेंदोर (30) असे मारहाण केलेल्या मुलाचे नाव आहे.

वडिलाचे घर पेटवले -

रामाने वडील मारोती पेंदोर यांच्याशी इंजापूर येथे भांडण केले. तुम्हाला जीवे मारतो, म्हणून कुऱ्हाड घेऊन फिरत होता. दरम्यान, आसन खुर्द येथे येऊन वडिलाचे घर पेटवले. यात सर्व वस्तू भस्मसात झाल्या. परंतु घर गावापासून दूर असल्यामुळे आग पसरली नाही. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांना आरोपी कुऱ्हाड हाती घेऊन उभा असल्याचे दिसले. तसेच त्याने उंदीर मारायचे केक खाल्याचे आढळून आले. त्यानंंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी गडचांदूर येथे नेले.

हेही वाचा - मुंबई: अश्लील प्रँक व्हिडिओमधून ४ महिन्यात २ कोटींची कमाई; तीन यूट्यूबरला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.