चंद्रपूर- चंद्रपूरवरून आवाळपूरकडे जात असणाऱ्या भरधाव ट्रकने एका व्यक्तीला जोरदार धडक दिल्याची घटना राजुरा शहरात घडली. हा अपघात आज सकाळी घडला. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. मोहम्मद हसन मोहम्मद नसरूद्दिन (वय.७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
मोहम्मद हसन मोहम्मद नसरूद्दिन हे राजुरा शहरातील ग्रामीण रुग्णालयासमोर जात होते. दरम्यान, चंद्रपूरकडून आवाळपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकणे मोहम्मद हसन यांना जोरदार धडक दिली. या भीषन अपघातात मोहम्मद हसन यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक शिवानंद रामके याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत मोहम्मद हसन हे प्रतिष्ठित नागरिक होते. त्यांच्या मृत्यूने राजुरा शहरात शोककळा पसरली आहे.
हेही वाचा- चिमूर पोलिसांची गावठी दारू विरोधात मोठी कारवाई, ५१ लाखांचा मुद्देमाल जप्त