चंद्रपूर - राजुरा येथील इंफॅन्ट जिझस संस्थेतील आदिवासी वसतिगृहात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार घडत होता. यामध्ये अनेक चिमुकल्या मुलींचे शोषण झाल्याची दाट शक्यता आहे. या प्रकाराला संस्थेचे पदाधिकारी देखील जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना सहआरोपी करण्यात यावे आणि या वसतिगृहाची मान्यता रद्द करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे राजू कुकडे, गोमती पाचभाई, यांनी पत्रकार परिषदेत केली.
काय आहे प्रकरण -
राजुरा येथे इंफॅट जिझस ही नामांकित इंग्रजी शाळा आहे. याच अंतर्गत आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह आहे. या संस्थेचे अध्यक्ष काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे तर सचिव राजुऱ्याचे नगराध्यक्ष अरुण धोटे हे आहेत. त्यांच्या आदिवासी वसतिगृहात मुलींची संख्खा १३० एवढी आहे. ६ एप्रिलला १३ मुलींची तब्येत बिघडल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी दोन मुलींची तब्येत जास्त खराब असल्याने त्यांना राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.