चंद्रपूर - जिल्ह्यात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, वरोरा, चिमूर असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात ६३.४२ टक्के मतदान झाले असून जिल्ह्याच्या मतदानाच्या टक्क्यात घसरण झाल्याचे चित्र आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ६ मतदारसंघापैकी ४ जागांवर भाजपने विजय मिळवला होता. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला १-१ जागा मिळाली होता. आज २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणीचा होत आहे. त्यामुळे यावेळेच्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचा गड कोण राखतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. थोड्याच वेळात निकालाचे कल हाती येतील.
मतदारसंघ | महायुती | महाआघाडी | विजयी उमेदवार |
राजुरा | संजय धोटे (भाजप) | सुभाष धोटे (काँग्रेस) | सुभाष धोटे(काँग्रेस) |
बल्लारपूर | सुधीर मुनगंटीवार (भाजप) | विश्वास झाडे(काँग्रेस) | सुधीर मुनगंटीवार(भाजप) |
चंद्रपूर | नाना शामकुळे(भाजप) | महेश मेंढे(काँग्रेस) | किशोर जोरगेवार (अपक्ष) |
वरोरा | संजय देवतळे(शिवसेना) | प्रतिभा धानोरकर(काँग्रेस) | प्रतिभा धानोरकर(काँग्रेस) |
ब्रम्हपुरी | संदीप गड्डमवार (शिवसेना) | विजय वडेट्टीवार (काँग्रेस) | विजय वडेट्टीवार (काँग्रेस) |
चिमूर | बंटी भांगडिया (भाजप) | सतीश वारजुरकर(काँग्रेस) | बंटी भांगडिया (भाजप) |
-
7.01 PM - वरोरा - २४व्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांची १०३६१ मतांनी आघाडी, शिवसेनेचे संजय देवतळे पिछाडीवर
-
6.47 PM - बल्लारपूर - २६ व्या फेरीअखेर भाजपचे सुधीर मुनगंटीवार ३१५०३ मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार यांची विजयी रॅली निघाली
-
6.25 PM - चंद्रपूर - अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार ६५९६८ मतांनी विजयी, भाजपचे नाना शामकुळे हे ३७१४८ मतांसह दुसऱ्या स्थानावर तर, काँग्रेसचे महेश मेंढे हे ११९७७ मतांनी तिसऱ्या स्थानावर
-
5.51 PM - बल्लारपूर - 24 व्या फेरीअखेर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार २७२७८ मतांनी पुढे, मुनगंटीवार यांना ७४८६३ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना ४७५८५ मते
-
5.33 PM - बल्लारपूर - भाजपचे सुधीर मुनगंटीवार २६८०६ मतांनी आघाडीवर
-
5.26 PM - वरोरा - काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ९१२५ मतांनी आघाडीवर, धानोरकर यांना ५९४४३ मते तर, शिवसेनेचे संजय देवतळे यांना ५०३१८ मते
-
5.23 PM - बल्लारपूर - २२व्या फेरीअखेर सुधीर मुनगंटीवार २६१७४ मतांनी पुढे
-
5.20 PM - वरोरा - २२ व्या फेरीत काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ८२०१ मतांनी आघाडीवर
-
5.03 PM - बल्लारपूर - भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार २४१४९ मतांनी पुढे
-
5.00 PM - वरोरा - काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर ७८१७ मतांनी आघाडीवर, शिवसेनेचे संजय देवतळे पिछाडीवर
-
4.48 PM - बल्लारपूर - 20व्या फेरीअखेर भाजपचे सुधीर मुनगंटीवार २१५६२ मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार यांना ५९४४९ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना ३७८३७
-
4.29 PM - बल्लारपूर - १८ व्या फेरी अखेर वंचितचे राजु झोडे यांची जोरदार मुसंडी, काँग्रेस उमेदवारापेक्षा १८४२ मतांनी मागे
-
4.28 PM - वरोरा - काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ६१४७ मतांनी आघाडीवर
-
4.24 PM - बल्लारपूर - १8व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार १८४५७ मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार यांना ५०६२९ मते, वंचितचे राजु झोडे यांना ३०३३० मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना ३२१७२
-
4.18 PM - बल्लारपूर - १७वी फेरी भाजपचे सुधीर मुनगंटीवार १६७२१ मतांनी पुढे
-
4.17 PM - राजुरा - काँग्रेसचे सुभाष धोटे २३७० मतांनी विजयी, स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप दुसऱ्या क्रमांकावर तर, भाजपचे संजय धोटे हे तिसऱ्या क्रमांकावर
-
4.13 PM - वरोरा - काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर ४७९५ मतांनी आघाडीवर, धानोरकर यांना ४८००९ मते तर, शिवसेनेचे संजय देवतळे यांना ४३१२४ मते
-
3.50 PM - बल्लारपूर - १६व्या फेरीत सुधीर मुनगंटीवार १५४४० मतांनी पुढे, मुनगंटीवार यांना ४५२४४ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना २९८०४ मते
-
3.45 PM - वरोरा - १७व्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर १४५५ मतांनी आघाडीवर, धानोरकर यांना ४३१८३ मते तर, शिवसेनेच संजय देवतळे यांना ४१७२८ मते
-
3.32 PM - बल्लारपूर - १5व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार 13798 मतांनी आघाडीवर
-
3.21 PM - बल्लारपूर - १४व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार १२५०७ मतांनी पुढे, काँग्रेसचे विश्वास झाडे पिछाडीवर
3.14 PM - बल्लारपूर - तेराव्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार ११५१२ मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार यांना ३७९०७ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना २६३९५ मते -
2.37 PM - बल्लारपूर - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे मूलमध्ये आगमन... मतमोजणी केंद्रात जाणार
-
2.22 PM - चिमूर - भाजपचे बंटी भांगडिया विजयी
-
2.03 PM - ब्रम्हपुरी - काँग्रेसचे उमेदवार विजय वडेट्टीवार १८ हजार मतांच्या फरकाने विजयी
-
2.02 PM - बल्लारपूर - १२व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार ३४६५० मतांसह आघाडीवर
-
2.01 PM - वरोरा - १३व्या फेरीत शिवसेनेचे संजय देवतळे १०६७ मतांनी आघाडीवर
-
1.39 PM - बल्लारपूर - ११ वी फेरी, भाजपचे सुधीर मुनगंटीवार ३०६०४ मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे विश्वास झाडे पिछाडीवर
-
1.39 PM - वरोरा - १० व्या फेरीत शिवसेनेचे संजय देवतळे ८३७ मतांनी आघाडीवर, देवतळे यांना २६२५९ मते तर, प्रतिभाताई धानोरकर यांना २५४२२ मते
-
1.33 PM - चिमूर - १७व्या फेरीअंती भाजपचे बंटी भांगडिया यांची ६७८७६ मतांनी आघाडी, काँग्रेसचे सतीश वारजुरकर पिछाडीवर
-
1.32 PM - बल्लारपूर - १०व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार २७६८९ मतांनी पुढे
-
1.19 PM - चिमूर - १६व्या फेरीत भाजप उमेदवार बंटी भांगडिया ६४२०७ मतांनी आघाडीवर तर, काँग्रेसचे सतीश वारजुरकर ५५७०० मते
-
1.15 PM - बल्लारपूर - ९व्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांची ६३६६ मतांनी आघाडी, मुनगंटीवार यांना २३९८३ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना १७६१७ मते
-
1.14 PM - वरोरा - ७व्या फेरीत शिवसेनेचे संजय देवतळे ७७५ मतांनी आघाडीवर
-
1.00 PM - चिमूर - १४व्या फेरीत भाजपचे बंटी भांगडिया यांना ५५१११ मते तर, काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना ४८८३४
-
12.57 PM - ब्रम्हपुरी - २१व्या फेरीअंती काँग्रेसचे विजय वडेट्टीवार १५८०७ मतांनी आघाडीवर, वडेट्टीवार यांना ८६३३७ मते तर, शिवसेनेचे संदीप गड्डमवार यांना ७०४७७ मते
-
12.51 PM - १५व्या फेरीत राष्ट्रवादीचे धर्मरावबाबा आत्राम ११५५७ मतांनी आघाडीवर, धर्मरावबाबा यांना ४९४५५ मते तर, अंबरिश आत्राम यांना ३५२८४ मते
-
12.46 PM - चंद्रपूर - अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार आघाडीवर
-
12.45 PM - चिमूर - तेराव्या फेरीअखेर भाजपचे बंटी भांगडिया ५०४९५ मतांनी पुढे तर, काँग्रेसचे सतीश वारजुरकर ४५४६८ मतांसह पिछाडीवर
-
12.41 PM - चंद्रपूर - १६व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार ३५ हजार मतांनी आघाडीवर
-
12.34 PM - ब्रम्हपुरी - १८ व्या फेरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार १५६९४ मतांनी पुढे
-
12.34 PM - चिमूर - चौदाव्या फेरीत भाजपचे बंटी भांगडिया ६५०० मतांनी आघाडीवर
-
12.32 PM - चिमूर - बाराव्या फेरी अखेर भाजपचे बंटी भांगडिया यांना ४५४७९ मते तर, काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना ४२८२५ मते
-
12.31 PM - वरोरा - सहाव्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे ५८८ मतांनी आघाडीवर
-
12.29 PM - चिमूर - अकराव्या फेरी अखेर भाजपचे बंटी भांगडिया यांना ४१८३१ मते, काँग्रेसचे सतीश वारजूरकर यांना ३९६६७ मते
-
12.24 PM - बल्लारपूर - सातव्या फेरीत सुधीर मुनगंटीवार यांची ३६०१ मतांनी आघाडीवर, मुनगंटीवार यांना १६८९८ मते तर, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना १३२९७ मते
-
12.20 PM - राजुरा - बाराव्या फेरीत स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप ३३८३० मतांनी आघाडीवर
-
12.16 PM - वरोरा - पाचव्या फेरीत शिवसेनेचे संजय देवतळे आघाडीवर
-
12.02 PM - राजुरा - अकराव्या फेरीत स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप यांना ३०६७१ मते, काँग्रेसचे सुभाष धोटे यांना २६४२३ मते तर, भाजपचे संजय धोटे यांना २०१११ मते
-
12.00 PM - चंद्रपूर - पंधराव्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार २३२१५ मतांनी आघाडीवर
-
11.59 AM - चिमूर - दहाव्या फेरी अखेर भाजपचे बंटी भागडिया यांना ३८३६१ तर, काँग्रेसच्या सतीश वारजुरकरांना ३६१७४ मते
-
11.50 AM - वरोरा - चौथ्या फेरीत शिवसेनेचे संजय देवतळे ३२९५ मतांनी आघाडीवर
-
11.39 AM - बल्लारपूर - सातव्या फेरीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे ११ हजार मतांनी पुढे
-
11.31 AM - चिमूर - दहाव्या फेरीत भाजपचे बंटी भांगडिया ३१६७ मतांनी आघाडीवर
-
11.26 AM - चंद्रपूर - अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार १५ मतांनी पुढे
-
11.21 AM - राजुरा - स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप १६०७७ मतांनी पुढे
-
11.20 AM - ब्रम्हपुरी - बाराव्या फेरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार १२९८८ मतांनी पुढे, शिवसेनेचे संदीप गड्डमवार पिछाडीवर
-
11.20 AM - बल्लारपूर - पाचव्या फेरीत भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना १२८१९ मते तर, काँग्रेसच्या विश्वास झाडे यांना ९९५६ मते
-
11.19 AM - चिमूर - नवव्या फेरीत भाजपचे बंटी भांगडिया ३५०० मतांनी पुढे
-
11.18 AM - चिमूर - आठव्या फेरीअंती काँग्रेसच्या सतीश वारजुरकर यांना २९०३१ मते, भाजपचे बंटी भांगडिया यांना ३१९६२ मते
-
11.18 AM - बल्लारपूर - चौथी फेरी अखेर भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांना ३११९ मतांची आघाडी, मुनगंटीवार यांना ११०७६ मते, काँग्रेसच्या विश्वास झाडे यांना ७९५५ मते
-
11.16 AM - चिमूर - सातव्या फेरीअंती काँग्रेसच्या सतीश वारजुरकरांना २६४६७ मते, भाजपच्या बंटी भांगडिया यांना २५७८४ मते
-
11.15 AM - ब्रम्हपुरी - दहाव्या फेरीत काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना १०४५१ मते
-
10.50 AM - चिमूर - सातव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांची ४९० मतांनी आघाडी
-
10.49 AM - बल्लारपूर - मतमोजणी केंद्र परिसरात कार्यकर्ते, समर्थकांची गर्दी वाढली...
-
10.40 AM - चिमूर - सहाव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांची ३८० मतांनी आघाडी
-
10.40 AM - राजुरा - स्वतंत्रता भारत पक्षाचे वामनराव चटप यांना २०२० मतांची आघाडी, वामनराव चटप यांना ९५५८ मते, काँग्रेसचे सुभाष धोटे यांना ७५३८, संजय धोटे यांना ४८३१ मते
-
10.35 AM - चिमूर - पाचव्या फेरीअंती काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना १९४६८ मते, भाजपचे बंटी भांगडिया यांना १९०७८ मते
-
10.24 AM - चिमूर - पाचव्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर ३९० मतांनी पुढे
-
10.23 AM - वरोरा - दुसऱ्या फेरीत काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर आघाडीवर, काँग्रेस कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
-
10.17 AM - वरोरा - पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे २४३ मतांनी आघाडीवर
-
10.16 AM - चिमूर - चवथ्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजुरकर यांना १२०६७ मते, भाजपचे बंटी भांगडिया यांना ११३२८ मते
-
10.10 AM - बल्लारपूर - दुसरी फेरी सुरू, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार ६००० मतांनी आघाडीवर
-
10.08 AM - चिमूर - चवथ्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजूरकर १४७ मतांनी आघाडीवर
-
10.02 AM - चंद्रपूर - तिसऱ्या फेरीत अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांना २६०० मतांची आघाडी
-
9.57 AM - बल्लारपूर - पहिल्या फेरीअंती भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना ३५४० मते, काँग्रेसचे विश्वास झाडे यांना २७१४ तर, वंचितचे राजु झोडे यांना ८२६ मते
-
9.46 AM - चिमूर - काँग्रेसचे सतीश वारजूरकर आघाडीवर, वारजूरकर यांना ३८९७ मते तर, भाजपचे बंटी भांगडिया यांना ३४८२ मते
-
9.44 AM राजुरा - काँग्रेसचे सुभाष धोटे यांना २६११ मते तर, भाजपचे संजय धोटे यांना १४४५ मते
-
9.43 AM - ब्रम्हपुरी - पहिल्या फेरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांना ४४६४ आणि शिवसेनेचे संदीप गड्डमवार यांना ३०७२ मते
-
9.41 AM - वरोरा - शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे १७८९ मतांनी आघाडीवर, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर पिछाडीवर
-
9.40 AM - बल्लारपूर - पहिल्या फेरी अखेर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना ३५४० मते
-
9.25 AM - चिमूर - दुसऱ्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजूरकर ३६९ मतांनी आघाडीवर, भाजपचे बंटी भांगडिया पिछाडीवर
-
9. 23 AM - चंद्रपूर - अपक्ष किशोर जोरगेवार आघाडीवर
-
9.20 AM - चिमूर - पहिल्या फेरीत काँग्रेसचे सतीश वारजूरकर ४१५ मतांनी आघाडीवर
- 9.11 AM - वरोरा - पहिल्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार संजय देवतळे आघाडीवर
- 9.02 AM - बल्लारपूर - भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना पोस्टल मत पत्रिकेतून 1700 मतांची आघाडी...
- 8.15 AM - बल्लारपूर - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार मत मोजणी केंद्रावर उपस्थित राहण्याची शक्यता...
- 8.00 AM - पोस्टल मतमोजणीस सुरुवात
- 7.30 AM - अधिकारी, कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल
- 7. 00 AM - मतमोजणीची तयारी पूर्ण