ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र-तेलंगणाचा प्रेमबंधात कोरोनाने टाकला मिठाचा खडा - महा-तेलंगणा सीमा लॉकडाऊन

दोन्ही राज्याच्या आपुलकीपुर्वक संबध दर्शविणारा पोडसा पूल दोन्ही राज्याचा प्रेमाचा सेतू ठरला आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या पूलावर हल्ली शुकशुकाट आहे.

Maha-telangana border
महा-तेलंगणा सीमा
author img

By

Published : Jun 6, 2020, 10:35 PM IST

चंद्रपूर - महाराष्ट्र -तेलंगणा दोन वेगवेगळ्या परंपरा जपणारे राज्य आहेत. वर्धा नदीने या राज्यांच्या सिमा निर्धारीत केल्या. मात्र, सिमेवरील इकडल्या तिकडल्या गावातील आपुलकीच्या, प्रेमाच्या संबधाला या सीमाही रोकू शकल्या नाहीत. मात्र, कोरोनाच सावट आले आणि सारेच थांबले. सिमा बंद झाल्या. यामुळे तळीरामांचीही पंचाईत झाली.

दोन्ही राज्याच्या आपुलकीपूर्वक संबध दर्शविणारा पोडसा पूल दोन्ही राज्याचा प्रेमाचा सेतू ठरला आहे. नेहमी वर्दळ असणाऱ्या या पूलावर हल्ली शुकशुकाट आहे.

जिल्ह्याचा शेवटचा टोकावर असलेल्या गोंडपिपरी तालूक्यातील पोडसा पुल महाराष्ट्र-तेलंगणाचा ऋणानूबंधाचा सेतू ठरला आहे. दोन्ही राज्यातील नागरिकांचे आपूकीचे नाते या पुलाने अधिक घट्ट केले. जिल्ह्यातील दारुबंदीनंतर तेलंगणातील सिरपूर तळीरांमासाठी "पंढरी" ठरले होते. विविध कामे घेऊन दोन्ही राज्यातील नागरिक सिमोलंघन करतात. मात्र, नेहमी वर्दळ असणाऱ्या पोडसा पुलावर हल्ली शुकशुकाट आहे.

तेलंगणातील सिरपूर,कवठाळा या दोन मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारपेठामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सिमावर्तीत भागातील लघू व्यावसायिक विविध वस्तू विक्रीला नेत असतात. हे दोन्ही बाजार स्वस्त असल्याने सिमावर्तीत भागातील नागरिक गर्दी करतात. दूसरीकडे तेलंगाणतील व्यापारी जिल्ह्यात येत असतात. मात्र, टाळेबंदीत सिमा बंद असल्याने दोन्ही राज्यातील लघू व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

मराठी, तेलगू भाषेचे असेही नाते....!

तेलंगणातील सीमावर्तीत भागात मराठी भाषा मोठ्या आनंदाने बोलली जाते. मायबोली तेलगू असतांनाही सिमावर्तीत भागातील खेड्यापाड्यात मराठी भाषेचा गोडवा बघायला मिळते. तर चंद्रपूर जिल्हाचा सिमावर्तीत भागात तेलगू भाषेचे आकर्षण आहे. दोन्ही राज्यातील नागरिकात रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याने भाषेचेही देवानघेवान झाले आहे. देश्यात भाषा वादाने टोक गाठलेले असतांना महाराष्ट्र-तेलंगणातील सिमावर्तीत भागात मराठी आणि तेलगू भाषेचे प्रेमाचे नाते दिसून येत आहे.

विवाहसोहळ्यांना टाळेबंदीचा फटका -

सीमावर्ती भागात रोटीबेटीचे व्यवहार केले जाते. दरवर्षी दोन्ही राज्यातील मुलामुलींची लग्नगाठ मोठ्या संख्येने पाडली जायची. मात्र, यावर्षी केवळ एकच विवाह सोहळा पार पडू शकला. टाळेबंदीचा फटका विवाहसोहळ्यांनाही बसला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.