ETV Bharat / state

चंद्रपूरमध्ये हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर; जनजागृतीकरिता लावण्यात आले 'लंग्स बिल बोर्ड' - etv bharat maharashtra

चंद्रपूरमधील हवा अत्यंत प्रदूषित झाली आहे. 0 ते 50 एअर क्वलिटी इंडेक्स हा निरोगी जीवनासाठी चांगला समजला जातो. परंतु या बिल बोर्डवर चंद्रपूरमधील एअर क्वलिटी इंडेक्स हा 210 ते 225 च्या दरम्यान दर्शविण्यात आला. याचाच अर्थ हवेमधील धुळीच्या कणांचे प्रमाण चारपट जास्त होते.

Lungs Bill Board
Lungs Bill Board
author img

By

Published : Nov 17, 2021, 7:24 PM IST

चंद्रपूर - वाढत्या प्रदूषणाचा विळखा बसत असताना शहरातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील रामनगर पोलीस स्टेशनसमोर चंद्रपूरातील प्रदूषण समजण्यासाठी लंग्स बिल बोर्ड (Lungs Bill Board) म्हणजे प्रदूषणाची माहिती देणारे फुफ्फुसाच्या आकाराचे उपकरण बसविण्यात आले. या उपकरणामुळे नागरिकांना हवेची गुणवत्ता सहजरित्या कळू शकणार आहे.

चंद्रपूरमधील हवेचे प्रदूषण धोकादायक पातळीवर ( dangerous levels of air pollution) पोहोचले आहे. 0 ते 50 एअर क्वलिटी इंडेक्स हा निरोगी जीवनासाठी चांगला समजला जातो. परंतु या बिल बोर्डवर चंद्रपूरमधील एअर क्वलिटी इंडेक्स (chandrapur air quality index) हा 210 ते 225 च्या दरम्यान दर्शविण्यात आला. याचाच अर्थ हवेमधील धुळीच्या कणांचे प्रमाण चारपट जास्त होते.

हेही वाचा-DELHI POLLUTION आपत्कालीन बैठक घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश

वातावरण फाउंडेशन मुंबई, इको-प्रो चंद्रपूर, चंद्रपूर महानगरपालिका, वसुंधरा अभियान महाराष्ट्र राज्य, आणि चंद्रपूरकर नागरिक यांच्यावतीने हे उपकरण बसविण्यात आलेले आहे. तर चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्यावतीने हे उपकरण प्रमाणित करण्यात आलेले आहे.

हेही वाचा-चंद्रपूर जिल्ह्यातील ध्वनी प्रदूषणात चिंताजनक वाढ

सावरकर चौकात हे बिल बोर्ड उपकरण लावल्यानंतर चंद्रपूरमधील हवेच्या गुणवत्ता सूचकांक 230 च्या जवळपास होता. त्याच वेळी इंटरनेटवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व व इतर संस्थांचा हाच गुणवत्ता सूचकांक 130 च्या आसपास होता. या दोघांतही शंभर गुणांचा फरक दिसतो. कारण रामनगर पोलीस स्टेशन समोरील हे उपकरण मनुष्याच्या श्वास घेण्याच्या उंचीवर म्हणजे साधारणतः पाच ते सात फूट उंचीवर लावण्यात आलेले आहे. तर इतर शासकीय उपकरणे 30 ते 40 फूट उंचीवर विविध इमारतींवर लावण्यात आलेली आहेत. यावरून दोन्ही उपकरणे बरोबर असले तरी आपल्या उंचीवर श्वास घेताना चंद्रपूरमधील हवा कशी घातक आहे, हे चटकन समजते.

हेही वाचा-Mumbai Air Quality : दिवाळीत मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली

मायक्रोंस म्हणजे काय ?
एअर क्वलिटी इंडेक्समध्ये प्रामुख्याने हवेतील धुळीचे प्रमाण 2.5 मायक्रोग्रॅम आणि 10 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटरला किती उपस्थित आहे हे मोजले जाते. 1 मायक्रोमीटर म्हणजेच एक मीटरचा 10 लाखवा भाग असतो. 1 इंच मध्ये साधारणतः 25,400 मायक्रोमीटरस असतात. इतके लहान धुळीचे कण म्हणजेच पीएम 2.5 असतात.

हेही वाचा-Miraculous Save मांजराने वाचवला नाल्यात फेकलेल्या नवजात बालकाचा जीव, मुंबई पोलिसांनी केले tweet

पीएम 2.5 चा मनुष्य जीवनावर कसा परिणाम होतो ?
धुळीचे कण अत्यंत लहान असल्यामुळेच श्वसनलिकेच्या माध्यमातून फुफ्फुसात जाऊन पोचतात. यांचा प्रवास फुफ्फुसांतुन रक्तापर्यंत होतो. ते रक्तात मिसळतात. त्यामुळे चंद्रपूर सारख्या प्रदूषित शहरात विविध श्वसनाच्या रोगांची वाढ होते. एखादा मनुष्य सतत अशा धुळीच्या वातावरणात राहात असेल तर त्याचे डोळे, नाक, घसा, खवखव करतो. वारंवार शिंका येणे, खोकला येणे, नाकातून द्रव वाहत राहणे, श्वासाची लांबी कमी होणे या सुरुवातीच्या समस्या समस्या सुरू होतात. परंतु काही वर्ष मनुष्य अशा वातावरणात राहिले तर त्याच्या फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होते. तो जास्त जोराने फुंकू शकत नाही. श्वासाचा वेग वाढतो. दमा होतो. फुफुसाचा कॅन्सर होतो. हृदय विकार मोठ्या प्रमाणात वाढतात. धुळीचे कण जास्त असलेल्या शहरांत हृदयविकार रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाणही जास्त असते. लहान मुले आणि वृद्ध यांच्यावर धुळीच्या कणांचा सर्वात जास्त परिणाम होतो. चंद्रपूरची हवा सामान्य हवेच्या तुलनेत तब्बल चार ते पाच पट जास्त प्रदूषित आहे. यामुळे येथील लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम झालेला आहे. त्यामुळेच चंद्रपूर शहरात त्वचेचे, डोळ्यांचे, नाक आणि घसा श्वसन नलिका व इत्यादींचे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.