ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष - चंद्रपुरातील डॉक्टरांचा स्तुत्य उपक्रम, गरजुंचे माफक दरात लसीकरण

author img

By

Published : Mar 16, 2021, 8:55 PM IST

कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. सरकारने खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी दिल्यानंतर, चंद्रपूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. भावेश मुसळे यांनी गरीब रुग्णांना अत्यंत माफक दरात ही लस उपलब्ध करून दिली आहे.

डॉ. भावेश मुसळे
डॉ. भावेश मुसळे

चंद्रपूर - कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी लसीकरणाला देखील सुरुवात झाली आहे. मात्र, असे असताना देखील नागरिक ही लस घेण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उत्सुक नाहीत. तर काही लोकांना लस घ्यायची आहे, मात्र लस विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत, अशा गरीब वर्गासाठी बालरोगतज्ज्ञ डॉ. भावेश मुसळे यांनी पुढाकार घेतला आहे. अशा लोकांना नाममात्र फी घेऊन लसीकरण करण्याची सुविधा डॉ. मुसळे यांनी उपलब्ध करून दिली आहे.

लसीकरण सर्वसामान्य लोकांना उपलब्ध व्हावे या उद्देशाने काही खासगी लसीकरण केंद्रांना देखील परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये डॉ. भावेश मुसळे यांच्या रुग्णालयाचा देखील समावेश आहे. 250 रुपये शुल्क आकारून ही लस देण्यात येत आहे. शासकीय केंद्रात ही लस निशुल्क आहे. मात्र, त्यासाठी बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागते. जे सधन लोक आहेत ते खासगी केंद्रात जाऊन लस घेत आहेत. मात्र, असेही काही लोक आहेत जे अत्यंत गरीब आहेत. मात्र, त्यांना लस घ्यायची असते. अशा लोकांकडून नाममात्र फी घेऊन डॉ. मुसळे लसीकरण करत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार 250 रुपयामागे 150 रुपये हे शासनाला जातात तर त्यावर शंभर रुपये हे संबंधित खासगी लसीकरण केंद्राला मिळतात. त्यातही या लसीला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे तापमान कायम ठेवावे लागते. त्यासाठी वेगळा स्टाफ उपलब्ध करून द्यावा लागतो. त्यासाठी वेगवेगळे कक्ष स्थापन करावे लागतात. ज्याची भरपाई म्हणून हे शंभर रुपये दिले जातात. मात्र, डॉ. मुसळे यांनी अनेक गरजू लोकांना केवळ 150 रुपयांत ही लस दिली आहे. त्यातही अत्यंत गरीब लोक आहेत त्यांना ही लस मोफत देण्यात आली आहे.

महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेचा रुग्णांना लाभ

गरीब लोकांसाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना उपलब्ध करून दिली आहे. यात या रुग्णांना अडीच लाखांपर्यंतची मोफत उपचार सेवा उपलब्ध आहे. मात्र अनेक रुग्णालये या योजनेचा लाभ देण्यास उत्सुक नसतात. मात्र मुसळे रुग्णालयाने यात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. तब्बल 1021 शस्त्रक्रिया या रुग्णालयात पार पडल्या आहेत, ज्याचा थेट लाभ या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळाला. म्हणूनच जेव्हा केंद्र सरकारने खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणाची परवानगी दिली. तेव्हा मुसळे यांच्या रुग्णालयाचा प्राधान्याने विचार करण्यात आला.

चंद्रपुरातील डॉक्टरांचा स्तुत्य उपक्रम, गरजुंचे माफक दरात लसीकरण

अशी असते लसीकरणाची प्रक्रिया

लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागते. त्यानंतर संबंधित केंद्रावर जाऊन आपले ओळखपत्र दाखवावे लागते. यानंतर लसीकरण केले जाते. 0.5 मिलिग्राम इतकी मात्रा या लसीतून दिली जाते. ही लस दोन ते आठ डिग्री इतक्या तापमानात ठेवावी लागते. लसीकरणाचा काही परिणाम रुग्णावर होता का? हे पाहण्यासाठी रुग्णाला अर्धातास देखरेखी खाली ठेवण्यात येते, त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने लसीचा दुसरा डोस देण्यात येतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.