चंद्रपूर - मास्क न लावता घराबाहेर पडणाऱ्या 55 जणावर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. ही कार्यवाही कोरपना नगरपंचायत व कोरपना पोलिसांनी केली. यात चार व्यावसायिकांचाही समावेश आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनाकडून घरातच राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. अतिमहत्त्वाचा कामानिमीत्याने घराबाहेर जात असल्यास मास्क लावून बाहेर पडण्याच्या सूचना असतानाही मास्क न घालता बाहेर पडणाऱ्यांवर प्रशाशनाने आता कार्यवाहीचा सपाटा सुरू केला आहे. अशात कोरपना शहरात मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी ये जा करणाऱ्यांवर ५५ व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडुन 19 हजार 100 रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. ही कार्यवाही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वात कोरपना नगरपंचायत, कोरपना पोलिसांनी केली.
मास्क न लावणे भोवले; 55 जणांवर दंडात्मक कारवाई
कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. प्रशासनाकडून घरातच राहण्याच्या सूचना केल्या जात आहेत. अतिमहत्त्वाचा कामानिमीत्याने घराबाहेर जात असल्यास मास्क लावून बाहेर पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.