ETV Bharat / state

Knife Attack In Chandrapur आयुक्ताच्या दालनात चाकूने वार,सुरक्षारक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली - Knife Attack In Chandrapur

चंद्रपूर शहर मनपा आयुक्त राजेश मोहिते Rajesh Mohite Commissioner of Chandrapur City Municipal Corporation यांच्या कक्षात एकाने स्वत:वर चाकूचे वार Knife attack in Municipal Commissioner office केल्याची घटना आज घडली आहे. घटनेचे कारण अद्यापही समोर आलेले नाही.लक्ष्मण पवार असे या जखमी इसमाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

Knife Attack In Chandrapur
आयुक्ताच्या दालनात चाकूने वार
author img

By

Published : Aug 19, 2022, 10:44 PM IST

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते Rajesh Mohite Commissioner of Chandrapur City Municipal Corporation यांच्या कक्षात घुसून एका इसमाने स्वतःवरच चाकू हल्ला Knife attack in Municipal Commissioner office केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षारक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण पवार असे या जखमी इसमाचे नाव आहे. तो लातूर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

स्वतःवरच चाकूचा हल्ला - काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहिते यांना सुरक्षारक्षक देण्यात आला. शहरातील समस्या घेवून शिष्टमंडळ, नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी येतात. अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात. मात्र, आजपर्यंत असा प्रकार झाला नव्हता. दुपारी आपल्या कक्षात आयुक्त असताना पवारांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली. थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला. आत आयुक्त पवार दोघेच होते. अचानक आयुक्तांनी भेदरलेल्या अवस्थेत सुरक्षारक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षारक्षकाने त्वरित आता प्रवेश केला. समोरचे दृश्य बघून त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली. पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला. यात ते गंभीररित्या जखमी झाले. अगदी क्षणभरात झालेला प्रकार मनपातील कर्मचाऱ्यांना माहित झाला. त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे घाव घेतली. प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, शहर पोलिसांना पवारला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. शेकडो किलोमीटरचे अंतर कापून पवार मोहितेंच्या भेटीला कशासासाठी आले. आयुक्तांच्या कक्षात त्या दोघात नेमके काय झाले, या प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासात समोर आल्यानंतरच स्वतःवरील चाकू हल्लाचे नेमके कारण समोर येईल.

हेही वाचा - Aaditya Thackeray on Dahi Handi दहीहंडी उत्सवात राजकारण कशाला आणता, आदित्य ठाकरेंनी राम कदमांना सुनावले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.