ETV Bharat / state

Kalkam Crime Case : आम्हाला न्याय मिळवून देण्याऐवजी घेतली कंपनीची बाजू; कलकामच्या गुंतवणूकदारांचा मनसे पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप - वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता

'कमी पैसे गुंतवणूक करा आणि मोठ्या व्याजदराने ते परत मिळवा,' असे आमिष कलकाम या कंपनीने गुंतवणूकदारांना दिले ( Kalkam Real Estate Company Cheated to Investors ) होते. चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यांतील १०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक या कंपनीत लोकांनी केली. परंतु, लोकांची फसवणूक झाल्याने त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. परंतु, त्यांनीही कंपनीची बाजू घेत लोकांची फसवणूक केल्याचा आरोप ( Investors 100 Crores Invested in Kalkam Company ) गुंतवणूकदारांनी केला आहे.

Kalkam Crime Case
कलकामच्या गुंतवणूकदारांचा मनसे पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
author img

By

Published : Sep 20, 2022, 2:35 PM IST

चंद्रपूर : कलकाम रिअल इस्टेट कंपनीने मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ( Kalkam Real Estate Company Cheated to Investors ) गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले. चंद्रपूर जिल्ह्यातील ही रक्कम तीस कोटींपेक्षा अधिक आहे. मात्र, गुंतवणूकदारांना त्यांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी हे पैसे परत करण्यासाठी तगादा लावला. या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप गुंतवणूकदारांनी केले ( Investors 100 Crores Invested in Kalkam Company ) आहे.

चंद्रपूर जिल्हा पदाधिकाऱ्यांनी घेतली कंपनी बाजू : मनसे नगरसेवक सचिन भोयर ( Kalkam Investors on MNS Corporator Sachin Bhoyer ), महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी या संपूर्ण प्रकारात कंपनीची बाजू घेऊन आमच्यावर अन्याय केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषद घेऊन याबाबत गुंतवणूकदारांनी आरोप केला आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने कलकामच्या प्रश्नावर राज ठाकरे लक्ष देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोयर यांनी केले दुर्लक्ष : कमी पैसे गुंतवणूक करा आणि मोठ्या व्याजदराने ते परत मिळवा असे आमिष कलकाम या कंपनीने गुंतवणूकदारांना दिले होते. चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भातील गडचिरोली, यवतमाळ व नागपूर या जिल्ह्यांतील १०० कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक या कंपनीत लोकांनी केली. काही दिवस याचा लाभदेखील गुंतवणूकदारांना मिळाला. मात्र, नंतर पैसे मिळण्यास टाळाटाळ होऊ लागली.

कलकामच्या गुंतवणूकदारांचा मनसे पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप

महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर यांनी दिले होते आश्वासन : यानंतर मनसेच्या महिला सेना शहराध्यक्ष प्रतिमा ठाकूर आणि वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष भरत गुप्ता यांनी आपले पैसे काढून देतो, असे आश्वासन दिले. मात्र, काही दिवसांतच त्यांनी गुंतवणूकदारांची मदत न करता कंपनीच्या संचालकांची बाजू घ्यायला सुरुवात केली. जे गुंतवणूकदार संचालकांना पैसे परत करण्यासाठी दाद मागायचे त्यांच्यावर दबाब आणून धमकावले जात होते, असा त्यांच्यावर आरोप आहे.

2017 पासून मनसे पदाधिकारी कंपनीला देत आहेत संरक्षण : 2017 पासून कंपनीला संरक्षण देऊन पैसे परत मिळण्यास अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांनी केला. या संदर्भात आम्ही मुंबई येथील आपले मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संजय जाधव, नंदू घाडी व मनसे महिला राज्य उपाध्यक्षा रिटा गुप्ता यांच्याकडे गेलो असता त्यांनी स्थानिक चंद्रपूर संपर्क अध्यक्ष सचिन भोयर यांच्याकडे हे प्रकरण सोपवले. मात्र, भरत गुप्ता आणि प्रतिमा ठाकूर यांच्यासोबत ते मिळून असल्याने त्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.

कुकडे यांनी प्रकरण लावून धरले, तर त्यांच्यावर झाला हल्ला : यानंतर गुंतवणूकदार यांनी वरोरा भद्रावती विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्याकडे प्रकरण सोपवले. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे याप्रकरणी तक्रार करून कंपनीच्या संचालक व अधिकारी यांच्यावर एम.पी.आय.डी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करायला लावून सर्व संचालकाला अटक करायची मागणी लावून धरली. त्यानंतर कंपनीच्या एकाला अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपीपर्यंत पोलीस पोहचले नाही. दरम्यान कलकामच्या गुंतवणूकदारांची बाजू घेतली म्हणून राजू कुकडे यांच्यावर भरत गुप्ता व प्रतिमा ठाकूर मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हल्ला करण्यात आला, असाही आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला.

अॅड. डांगे यांनीही केले दुर्लक्ष : मनसे नेत्या रिटा गुप्ता चंद्रपूर दौऱ्यावर आल्या असता परतगुंतवणूकदारांनी निवेदन देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी विनंती केली. तर त्यांनी जनहित विधी कक्ष विभागाच्या जिल्हाध्यक्षा अॅड. मंजू डांगे याच्याकडे हे प्रकरण सोपवले, मात्र त्यांनीसुद्धा काहीही केले नाही. आम्ही जिल्ह्यातील जवळपास 10 हजारांपेक्षा जास्त गुंतवणूकदार आपल्याकडून न्यायाची आस घेऊन बसलो आहे, असे आवाहन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले.

असे असेल तर राजसाहेबांची भेट घडवून आणू : यासंदर्भात नगरसेवक सचिन भोयर यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार केवळ आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष केलs जाते आहे, आमचे या प्रकरणात काहीही नसताना असा प्रकार वारंवार केला जात आहे. प्रतिमा ठाकूर यांनी यासंदर्भात सांगितले की, यापूर्वीदेखील आम्ही आमची जाहीरपणे बाजू मांडली होती. अनेकांना यात अटक झाली काही फरार आहेत. जर राज साहेबांना भेटून त्यांच्या समस्यांचा तोडगा निघत असेल, तर आम्ही त्यांची साहेबांसोबत भेट घडवू, असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.