ETV Bharat / state

पहिल्या महायुध्दातील वीर सेनानीचे स्टार पदक खोदकामात सापडले - चंद्रपूरच्या बातम्या

पहिल्या महायुध्दात आपल्या शौर्याने ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधणाऱ्या मकसूद अली खान या सेनानीचे स्टार पदक खोदकामात एका मजुराला सापडले आहे. एका वीर सेनानीची भूगर्भात दडलेली शौर्यगाथा त्यामुळे उजेडात आली आहे.

first war Medals found in excavations
author img

By

Published : Oct 28, 2019, 12:20 PM IST

चंद्रपूर - संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या पहिल्या महायुध्दात भारतीय सैनिक बहादुरीने लढले. विभिन्न देशाच्या भूमीत आपल्या शौर्याची पताका भारतीय सैनिकांनी फडकवली. या युध्दात ६२ हजार भारतीय सैनिकांना वीरमरण आले. ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम केला. युध्दात पराक्रम गाजविणाऱ्या सैनिकांना स्टार पदक देऊन गौरव केला. पहिल्या महायुध्दात आपल्या शौर्याने ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधणाऱ्या मकसूद अली खान या सेनानीचे स्टार पदक खोदकामात एका मजुराला सापडले आहे. एका वीर सेनानीची भूगर्भात दडलेली शौर्यगाथा त्यामुळे उजेडात आली आहे.

हेही वाचा - परतीच्या पावसाचा फटका; उभी पिके झाली आडवी, ऐन दिवाळीत शेतकऱ्यांचे दिवाळे

संपूर्ण जगाला हादरवून सोडलेल्या पहिल्या महायुध्दाला 'ग्रेट वॉर' म्हणूनही ओळखले जाते. पहिल्या महायुध्दाची सुरुवात 28 जुलै 1914 साली झाली. तब्बल साडे चार वर्षानंतर 11 नोव्हेंबर 1918 ला युध्द संपले. या युध्दात ७ कोटी सैनिकांनी भाग घेतला होता. पहिल्या महायुध्दाच्या वेळेस भारतात स्वातंत्र्य चळवळीला वेग आला होता. मात्र, इग्लंडमुळे भारतीय सैनिक पहिल्या महायुध्दात ओढले गेले. या युध्दात 13 लाख भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 62 हजार सैनिकांना वीरमरण आले तर 67 हजार सैनिक जखमी झाले होते. भारतीय सैनिकांच्या शौर्याने ब्रिटिश सरकार प्रभावित झाले. त्यावेळी "व्हिक्टोरीया क्रास पदक" आणि "स्टार पदक" देऊन ब्रिटिश सरकारने भारतीय सेनांनीचा गौरव केला. पहिल्या महायुध्दात आपल्या शौर्याने ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधणाऱ्या मकसूद अली खान या सेनानीचा १९१४-१५ साली स्टार पदक देऊन गौरव करण्यात आला.

पदक कसे सापडले, त्याविषयी माहिती देताना भिकारू जुनघरे

हेही वाचा - ऐन दिवाळीत चंद्रपूर जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी संपवले जीवन

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या धाबा येथील भिकारू जुनघरे या तरुणाला कागदनगर येथे इमारतीसाठी खोदकामा करताना, मकसूद अली खान यांना देण्यात आलेले स्टार पदक सापडले. पदकाच्या पुढील भागावर ब्रिटिश सरकारचा ताज, दोन विभागणाऱ्या तलवारी मध्यभागी कोरल्या आहेत. तर खालच्या बाजूला GV लिहिले आहे. पदकाच्या मागच्या बाजूला 'no.2975 sowar muqsud ali khan 20/LCRS' असे कोरले आहे. सात वर्षांपासून भिकारू जुनघरे याने पदक सांभाळून ठेवले आहे. पहिल्या महायुध्दाला शंभर वर्षे पूर्ण झाली. या युध्दात वीरमरण आलेल्या भारतीय सैनिकांचे विस्मरण झाले असतांना भूगर्भात दडलेली शौर्यगाथा उजेडात आली आहे.

Intro:पहील्या महायुध्दातील विर सेनानीचे स्टार पदक खोदकामात सापडले

चंद्रपुर

संपुर्ण जगाला हादरवून सोडणार्या पहील्या महायुध्दात भारतीय सैनिक बहादूरीने लढले. विभिन्न देशाच्या भुमित आपल्या शौर्याची फताका भारतीय सैनिकांनी फडकवीली. या युध्दात ६२ हजार भारतीय सैनिकांना विरमरण आले. ब्रिटिश सरकारने भारतीय सैनिकांचा शौर्याला सलाम केला. युध्दात पराक्रम गाजविणार्या सैनिकांना स्टार पदक देऊन गौरव केला. पहिल्या महायुध्दात आपल्या शौर्याने ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधणार्या मकसूद अली खान या सेनानीचे स्टार पदक खोदकामात मजूराला सापडले. एका विर सेनानीची भुगर्भात दडलेली शौर्यगाथा उजेडात आली.

संपुर्ण जगाला हादरवून सोडलेल्या पहील्या महायुध्दाला " ग्रेट वाॕर " म्हणूनही ओळखल्या जाते. पहील्या महायुध्दाची सूरवात 28 जुलै 1914 झाली. तब्बल साडे चार वर्षानंतर 11 नोव्हेंबर 1918 ला यूध्द संपले. या युध्दात सात कोटी सैनिकांनी भाग घेतला होता.

पहील्या महायुध्दाचा वेळेस भारतात स्वातंत्र्य चळवळीला वेग आला होता मात्र इग्लंड मुळे भारतीय सैनिक पहील्या महायुध्दात ओढले गेले. या युध्दात 13 लाख भारतीय सैनिकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 62 हजार सैनिकांना विरमरण आले तर 67 हजार सैनिक घायल झाले होते. भारतीय सैनिकांनी युध्द भुमिवर अतूलनिय शौर्य दाखविले.
यूध्दात विभिन्न देशातील भुमिवर भारतीय सैनिक बहादूरीने लढत होते. भारतीय सैनिकांचा शौर्याने ब्रिटिश सरकार प्रभावित झाले. सैनिकांचा शौर्यांना ब्रिटिश सरकारने सलाम केला. "व्हीक्टोरीया क्रास पदक " आणि " स्टार पदक " देऊन ब्रिटिश सरकारने भारतीय सेनांनीचा गौरव केला. पहील्या महायुध्दात आपल्या शौर्याने ब्रिटिश सरकारचे लक्ष वेधणार्या मकसूद अली खान या सेनानीला १९१४-१५ स्टार पदक देऊन गौरव करण्यात आला. चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालूक्यात येणाऱ्या धाबा येथिल भिकारु जूनघरे या तरुणाला कागदनगर येथे इमारतीचा बांधकामाचा खोदकामा मकसूद अली खान यांना देण्यात आलेले स्टार पदक सापडले.पदकाचा पुढील भागावर ब्रिटीश सरकारचा ताज,दोन विभागणार्या तलवारीचा मध्यभागी 1914-15 कोरले आहे.तर खालचा बाजूला GV लिहीले आहे . पदकाचा मागचा बाजूला no.2975 sowar muqsud ali khan 20/LCRS असे कोरले आहे.सात वर्षापासून भिकारु जूनघरे याने पदक सांभाळून ठेवले आहे.पहील्या महायुध्दाला शंभर वर्ष पुर्ण झालीत. या युध्दात विरमरण आलेल्या भारतीय सैनिकांचे विस्मरण झाले असतांना भुगर्भात दडलेली शौर्यगाथा उजेडात आली आहे.Body:विडीओ बाईट
भिकारु जूनघरेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.