ETV Bharat / state

अडीच वर्षांनंतर मुहूर्त सापडला : खासदार धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन - चंद्रपूर खासदार

खासदार बाळू धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकृत उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धानोरकर यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचीही उपस्थिती होती.

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
author img

By

Published : Feb 27, 2022, 9:07 AM IST

चंद्रपूर - 2019 च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात काँग्रेस पक्ष नामोहरम झाला असताना चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून मात्र काँग्रेसचे बाळू धानोरकर निवडून आले. ते निवडून आल्याच्या अडीच वर्षानंतर त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या या कार्यालयाचे अधिकृत उद्घाटन झाल्याने जनसामान्यांना त्यांच्या तक्रारी आणि समस्या घेऊन जाणे आता सुकर होणार, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

खासदार बाळू धानोरकर हे मूळचे वरोऱ्याचे आहेत. ते यापूर्वी भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे आमदार होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. सर्वत्र भाजपची हवा असताना काँग्रेसला चंद्रपूरात त्याविरुद्ध सक्षम असा पर्याय दिसत नव्हता. अशावेळी बाळू धानोरकर यांनी काँग्रेसकडून उभे राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट मिळाले आणि काँग्रेसचे राज्यातून निवडून आलेले एकमेव खासदार म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने आपल्या समस्या सोडवाव्या अशी अपेक्षा जनसामान्यांची असते तसेच लोकप्रतिनिधीचे ते आद्य कर्तव्यच असते. मात्र, धानोरकर हे मूळचे वरोरा येथील असल्याने तेथील जनसंपर्क कार्यालयात जायचं कसं हा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांना होता. ही अडचण धानोरकर यांच्याही लक्षात आली. त्यांनी चंद्रपूरात निवासस्थान आणि जनसंपर्क कार्यालय शोधण्यासाठी प्रयत्न केले. अनेक महिन्यांच्या शोधानंतर अखेर त्यांना सरकारनगरमध्ये बंगला मिळाला. येथेच त्यांनी जनसंपर्क कार्यालय देखील सुरू केले.

मात्र शहराच्या एका टोकावर असलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची माहिती मोजक्याच लोकांना होती. तसा प्रसारही धानोरकरांकडून झाला नाही. धानोरकर कधी निवासस्थानी असतात याचीही कल्पनाही सामान्यांना नव्हती. सामान्य नागरिकांना यापूर्वी त्यांनी याच जनसंपर्क कार्यालयात दोनदा जनता दरबार भरवले गेले. मात्र त्याला फारसा प्रतिसाद सामान्य नागरिकांकडून मिळाला नाही. याच वेळी खासदार यांच्या मित्रनगर यांच्या निर्माणाधीन बंगल्याला लागूनच जनसंपर्क कार्यालयाचे बांधकाम सुरू होते. आज या जनसंपर्क कार्यालयाच्या अधिकृत उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खासदार धानोरकर यांच्यासह पालकमंत्री विजय वडेट्टीवार, धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांचीही उपस्थिती होती. तब्बल अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ह्या अधिकृत जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाले. आता त्या माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्न मार्गी लागणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.