चंद्रपूर - 26 जानेवारी, 1950 रोजी सर्व धर्मांच्या ग्रथांहून पवित्र अशी घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. याच राज्य घटनेमुळे हा देश शिल्लक आहे. तुम्ही आम्ही शिल्लक आहोत. हे राज्य घटने प्रमाणे चालले पाहीजे. घटनाबाह्य कृती कोणी कितीही मोठा असेल आम्ही सहन करणार नाही, असे खार जमिनी विकासमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथे पंचायत समिती व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय बालक्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक संमेलानाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, शिक्षणाबरोबर संस्कार आणि संगतीही महत्वाची असते. शिक्षण, संस्कार आणि संगती या तीन गोष्टीची परिपुर्णता असेल, तर तो विद्यार्थी परिपूर्ण होते. संगत चांगली व निर्वसनी असली तर विद्यार्थ्याचे भविष्य उज्जल होते. विद्यार्थ्यांनी आपापसात संवाद साधत राहणे गरजेचे आहे. दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
हेही वाचा - 'ज्यांच्या घड्याळाचे बारा वाजले त्यांच्याबद्दल काय बोलयचे'
या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती लता पिसे होत्या. उद्घाटन कार्यक्रमावेळी माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, जिल्हा परिषद सदस्य तथा गट नेते डॉ. सतिश वारजूकर, उपसभापती रोषण ढोक, जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके, जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, सरपंच दीक्षा भगत, उपसरपंच सविता चौधरी, गट विकास अधिकारी संजय पुरी, गट शिक्षणाधिकारी किशोर पिसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नंदू गावंडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा - मामाच ठरला कर्दनकाळ, चार वर्षाच्या भाच्याची हत्या
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक काकाजी वाघमारे व विनोद गेडाम यांनी केले. गटशिक्षणाधिकारी किशोर पिसे यांनी प्रास्ताविक सादर केले तर आभार केंद्रप्रमुख रुपचंद बन्सोड मानले.
हेही वाचा - राजुरा पोलीस ठाण्यातील शिपायाची विष पिऊन आत्महत्या?