ETV Bharat / state

रूग्णवाहिकेतून दारूची तस्करी; रामनगर पोलिसांच्या छाप्यात 65 पेट्या जप्त - बाबुपेठ परिसर चंद्रपूर

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 65 पेट्यांचा दारूसाठा जप्त केला आहे. संबंधित जप्त केलेली रूग्णवाहिका बीव्हीजी ग्रुपची असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
author img

By

Published : Aug 18, 2019, 9:30 PM IST

चंद्रपूर - अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी 65 पेट्यांचा दारूसाठा जप्त केला आहे. चालक राहुल वानखेडे याला अटक झाली असून, त्याच्या सोबतचे दोन आरोपी फरार आहेत. संबंधित जप्त केलेली रूग्णवाहिका बीव्हीजी ग्रुपची असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

रूग्णवाहिकेतून दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रात्री 3 च्या दरम्यान एमएच 14 सीएल 0891 ही रुग्णवाहिका रामनगर पोलीस ठाणे चौकात आल्यावर पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने गाडी न थांबवता पळ काढला. यानंतर या रुग्णवाहिकेचा पाठलाग करून बाबुपेठ परिसरात ही गाडी पकडण्यात आली. रूग्णवाहिकेतील तिघांपैकी दोघे पळ काढण्यात यशस्वी झाले असून, चालक राहुल वानखेडे पोलिसांच्या हाती लागला आहे. ही दारू यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपूरात आणली जात होती.

अत्यावश्यक सेवा पोहोचवणाऱ्या रुग्णवाहिकेतून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून वेगवेगळ्या मार्गांनी दारू तस्करी केली जाते. सिलेंडरमधून, भाजीपाल्याच्या टोपलीतून तसेच गाडीत विशेष कप्पे करून, अन्नधान्याच्या पोत्यांतून ही तस्करी केली जात असल्याचे अनेक पोलीस कारवायांमधून समोर आले आहे.

या रुग्णवाहिकेचा वापर जवळच्या शासकीय रुग्णालयासाठी केला जातो. याचाच गैरफायदा यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णवाहिका कर्मचारी घेत होते. आरोपी राहुल वानखेडे परस्पर दारूची तस्करी करत असल्याची माहिती मिळत आहे.

Intro:
चंद्रपुर : रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकेतून चक्क दारू तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. ही रुग्णवाहिका रुग्णांऐवजी तळीरामांसाठी जीवनदायी ठरली होती. अखेर आज या प्रकारचे बिंग फुटले. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी चालकांचा 65 पेट्या दारूसाठा जप्त केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यापासून येथे वेगवेगळ्या पद्धतीने दारूचीतस्करी केली जाते. कधी सिलेंडरतून, कधी भाजीपाल्याच्या टोपलीतून, कधी गाडीच्या खाली विशेष कप्पे करून, कधी अन्नधान्याच्या पोत्यातून ही दारुतस्करी केली जात असल्याचे अनेक पोलीस कारवाईतुन समोर आले. आज असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला रुग्णांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी जबाबदारी दिलेल्या 108 रुग्ण माहिती रुग्णवाहिकेतून दारु तस्करी केली जात असल्याची गुप्त माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. रात्री 3 वाजता एमएच 14 सीएल 0891 ही रुग्णवाहिका रामनगर पोलीस ठाणे चौकात आली असता त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, चालकाने ही गाडी न थांबवता पळ काढला. यानंतर या रुग्णवाहिकेचा पाठलाग करण्यात आला. बाबुपेठ परिसरात ही गाडी पकडण्यात आली.या गाडीमध्ये तीन जण होते त्यापैकी दोन फरार झाले तर चालक राहुल वानखेडे पोलिसांच्या हाती लागला. गाडीची तपासणी केली असता या रुग्णवाहिकेत 65 पेटी दारूचा साठा आढळून आला या प्रकरणात पोलिसांनी दारूसाठा, चालक आणि वाहनाला जप्त केले. मात्र या घटनेतून रुग्णवाहिकेच्या सेवेला मोठे गालबोट लागले आहे. ही दारू यवतमाळ जिल्ह्यातून चंद्रपुरात येत होती. 108 रुग्णवाहिकेतून जवळच्या शासकीय रुग्णालयात रुग्णाला दाखल करण्यात येते. याचाच फायदा यवतमाळ जिल्ह्यातील या रुग्णवाहिकेचे कर्मचारी घेत होते. ते मोठया प्रमाणात दारूचा साठा घेऊन चंद्रपुरात आणत होते. हा वानखेडे चालक परस्पर दारूची तस्करी करीत असल्याची माहिती आहे.
Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.