ETV Bharat / state

सावकाराच्या कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न.. हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू

चंद्रपुरात एका अवैध सावकाराने एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.

जखमी महिलेचा मृत्यू
author img

By

Published : May 14, 2019, 5:51 PM IST

चंद्रपूर - एका अवैध सावकाराने कर्जदार कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचा घटना घडली. यावेळी शिक्षक, त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाले होते. यात गंभीर जखमी असलेल्या महिलेचा आज मृत्यू झाला. यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले असून, अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.

शास्त्रीनगर येथील रहिवाशी रघुनाथ हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक असून, त्यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू सरदार याच्याकडून १० टक्के व्याजाने ३ लाख रुपये घेतले होते. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी परत केले होते. उर्वरित पैसे घेण्यासाठी ७ मे'ला सोनू सरदार हरिणखेडे त्या कुटुबाच्या घरी गेला. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा त्याचा आग्रह त्यांनी केला.

यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक वादावादी झाली. तेव्हा जसबीरने आपल्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॉटलमधून पेट्रोल काढून अचानकपणे मुलगा पीयूष आणि पत्नी कल्पना यांच्या अंगावर शिंपडले व पेटवून दिले. यात जसबीरही किरकोळ भाजला. पण तो तिथून पळून गेला. यात कल्पना हरिनखेडे ६० टक्के भाजल्या. तर मुलगा पियुष हा देखील १० टक्के भाजला. दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, कल्पना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, आज कल्पना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. विशेष म्हणजे आरोपी सोनू सरदार हा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचार करायला हवे होते. परंतु तसे न करता आरोपीला विशेष उपचार मिळत आहेत.

Intro:चंद्रपुर : एका अवैध सावकाराने कर्जदार कुटुंबाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता, ज्यात शिक्षक, त्यांची पत्नी आणि मुलगा जखमी झाला होता. यात गंभीर जखमी असलेल्या महिलेने आज अखेरचा श्वास घेतला. यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण लागले असून अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
Body:शास्त्रीनगर येथिल राहणारे रघुनाथ हरिणखेडे हे व्यवसायाने शिक्षक असून, त्यांनी जसबीर भाटीया उर्फ सोनू सरदार याच्या कडून तीन लाखांचं 10 टक्के प्रमाणे कर्ज घेतलं होतं. त्यापैकी दोन लाख रुपये त्यांनी परत केले होते. आज उर्वरित पैसे घेण्यासाठी 7 मे ला सोनू सरदार हरिणखेडे यांच्या घरी गेला. संपूर्ण कर्ज आजच परत करा असा त्याचा आग्रह होता. यावेळी जसबीर आणि हरिणखेडे कुटुंबीयात शाब्दीक खडाजंगी उडाली. तेव्हा जसबीरनं आपल्या गाडीच्या डिकीत ठेवलेल्या बॉटलमधून पेट्रोल काढून अचानकपणे मुलगा पीयूष आणि पत्नी कल्पना यांच्यावर शिंपडले व पेटवून दिलं. यात जसबीरही किरकोळ भाजला. पण तो तिथून पळून गेला. यात कल्पना हरिनखेडे 60 टक्के जळाल्या होत्या. तर मुलगा पियुष हा देखील 10 टक्के जळाला. दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, कल्पना यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, आज कल्पना यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण लागले आहे. विषेश म्हणजे आरोपी सोनू सरदार हा नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात उपचार करायला हवे होते. परंतु तसे न करता अरिपीला विशेष उपचार मिळत आहे.Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.