ETV Bharat / state

राष्ट्रसंताच्या कर्मभूमीतच राष्ट्रसंताकडे दुर्लक्ष - चिमूर पंचायत समीती बातमी

चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. तुकडोजी महाराजांनी किशोरावस्थेत साधना भूमी गोंदेळा येथे वास्तव्य केले. संपूर्ण चिमूर तालुक्यामध्ये त्यांचा संचार होता. त्यांची अनेक भजने या परिसरात निर्माण झाली आहेत.

ignorance towards statue-of-tukdoji-maharaj-and-dagadoji-maharaj-in-chandrapur

author img

By

Published : Jan 9, 2020, 1:17 PM IST

चंद्रपूर- येथील चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे. चिमूर पंचायत समिती कार्यालयसमोर तुकडोजी महाराज आणि गाडगे महाराज यांचे पुतळे आहेत. मात्र, येथील प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. पुतळ्यावर धूळ चढली आहे. तसेच, पुतळ्याच्या भिंतीला तडे गेले आहेत.

राष्ट्रसंताच्या कर्मभुमीतच राष्ट्रसंताकडे दुर्लक्ष

हेही वाचा- जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर.. पाहा, कोण आहेत तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री ?

चिमूर ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी आहे. 'पत्थर सारे बम बनेंगे भक्त बनेगी सेना' या क्रांती गिताने चिमूरची तरुणाईने १६ आ‌ॅगस्ट १९५६ ला इंग्रजांच्या राजसत्तेविरुद्ध पेटून अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले होते. देशात सर्व प्रथम तीन दिवस चिमूरने स्वांतत्र उपभोगले होते. तुकडोजी महाराजांनी किशोरावस्थेत साधना भूमी गोंदेळा येथे वास्तव्य केले. संपूर्ण चिमूर तालुक्यामध्ये त्यांचा संचार होता. त्यांची अनेक भजने या परिसरात निर्माण झाली आहेत. चिमूर ही राष्ट्रसंताची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सर्वांगीण ग्रामविकास आणि ग्रामस्वच्छता यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे. त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांचे पुतळे शेकडो ग्रामपंचायत प्रवेशद्वारावर कोरण्यात आले आहेत. तसेच या दोन्ही संतांच्या नावाने स्वच्छतेचे पुरस्कार वाटण्यात येतात.

ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या विविध कल्याणकारी तथा विकासात्मक योजना राबविण्याचे काम पंचायत समितीमधून केले जाते. पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरिक आपल्या विविध कामासाठी येत असतात. त्यामळे चिमूर पंचायत समितीच्या जुन्या इमारती शेजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी गाडगे महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. प्रशासनाने फक्त वरिष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी केली. मात्र, या महापुरुषांचे विचार आणि महान कार्यायास अनुसरून पुतळ्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे दोन्ही पुतळ्यावर व या खोलीत धुळीचे साम्राज्य आहे. तसेच येथे अडगळीचे साहित्य ठेवल्याने स्टोअर रुमचे स्वरूप आले आहे. त्यामुळे या झोपलेल्या प्रशासनास कधी जाग येईल, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.

Intro:राष्ट्रसंताच्या कर्मभुमीतील कार्यालयातच राष्ट्रसंत दुर्लक्षीत
चिमूर पंचायत समिती मधील पुतळे दुर्लक्षीत
स्वच्छतेच्या संताच्या मंदीरातच स्वच्छतेचा बोजवारा
चिमूर
पत्थर सारे बाम बनेंगे भक्त बनेगी सेना …. या क्रांती गिताने चिमूरची तरूणाई १६ आगस्ट १९५६ ला इंग्रजी राजसत्ते विरूद्ध पेटुन इंग्रजी अधिकाऱ्यांना सळो की पळो करून सोडले . देशात सर्व प्रथम तिन दिवस चिमूरने स्वांतत्र उपभोगले .मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या कर्मभुमी मध्ये असलेल्या पंचायत समीती कार्यालय परीसरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व कर्मयोगी गाडगे महाराजांचे पुतळे दुर्लक्षीत आहेत .
राष्ट्रसंत किशोर अवस्थेत असताना साधना भुमी गोंदेळा येथे वास्तव्य केले .संपूर्ण चिमूर तालुक्या मध्ये त्यांचा संचार होता . अनेक भजने या परीसरात निर्माण झालीत व त्यांच्या स्वराने गुंजली .राष्ट्रसंताच्या प्रेरणेने चिमूर क्रांती झाली अशा प्रकारे चिमूर हि रास्ट्रसंताची कर्मभूमी म्हणुन प्रसिद्ध आहे .सर्वांगीन ग्रामविकास आणी ग्रामस्वच्छता यामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज तथा कर्मयोगी गाडगे महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे आहे .प्रेरणा मिळावी या उद्देशाने यांचे पुतळे शेकडो ग्रामपंचायत प्रवेश द्वार , ग्रामद्वारावर पुतळे कोरण्यात आलेत .तसेच या दोन्ही संतांच्या नावाने स्वच्छतेचे पुरस्कार वाटपास प्रारंभ केले .
ग्रामपंचायत स्तरावर शासणाच्या विविध कल्याणकारी तथा विकासात्मक योजना कार्यांन्वीत करण्याचे काम पंचायत समीती मधुन केल्या जाते .पंचायत समिती मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच नागरीक आपल्या विविध कामा करीता येत असतात .त्यामळे चिमूर पंचायत समितीच्या जुन्या इमारती शेजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणी कर्मयोगी गाडगे महाराज यांचे पुतळे उभारण्यात आले . प्रशासणाने फक्त वरीष्ठांच्या आदेशाची अंमलबजावणी केली मात्र या महापुरुषांचे विचार आणी महान कार्य यास अनुसरून या पुतळ्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न केला नाही . ज्यामूळे दोन्ही पुतळ्यावर व या खोलीत धुळीचे साम्राज्य आहे .बॅनर फ्रेम यांच्याच पुतळ्याच्या आधाराने ठेवण्यात आले आहे . बिनकामाचे साहित्य ठेवल्याने स्टोअर रूमचे स्वरूप आले आहे . त्यामुळे या झोपलेल्या प्रशासणास कधी जाग येईल असा संतप्त सवाल नागरीक करीत आहेत .
O००

Body:१ )चिमूर पंचायत समिती मधील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे महाराज यांचा पुतळा २ ) दिपक धोंगडे , गुरूदेव भक्त तथा सरपंच अमरपूरी Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.