ETV Bharat / state

राजुरा येथे शॉर्टसर्किटमुळे आग, लाखोंचे नुकसान

सकाळी ११ च्या  सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे  याच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागल्याचे दिसून आले.अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

author img

By

Published : May 18, 2019, 9:51 PM IST

चंद्रपूर - राजुरा येथील साईनगर येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. नागरिकांच्या सतर्कतेने ही आग विझवण्यात आली आहे. आगीमुळे घराचे लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

साई नगर येथील रामदास पडवेकर यांच्या घरी भाड्याने ज्ञानेश्वर चौखे राहातात. ते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी आहेत. ते कुटुंबीयांसह बाहेर गावी गेले आहेत. आज सकाळी ११ च्या सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे याच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले. थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलावले. त्यांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागल्याचे दिसून आले.

या बाबत नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाला कळविण्यात आले. माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचले. त्याचबरोबर विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. या आगीत ज्ञानेश्वर चौखे यांचे मोठे नुकसान झाले आहे.

चंद्रपुर : राजुरा येथील साईनगर येथे शॉर्टसर्किटमुळे एका घराला आग लागली. नागरिकांच्या सतर्कतेने ही आग विझविण्यात आली असली तरी यात लाखोंचे नुकसान झाल्याची शक्यता आहे.

 राजुरा येथिल साई नगर निवासी रामदास पडवेकर ह्यांच्या घरी किरायाने राहात असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी ज्ञानेश्वर चौखे हे कुटुंबीयांसह बाहेर गावी गेले आहे. आज सकाळी 11 च्या सुमारास घरमालकांना ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे लक्षात आले.

थोड्या वेळातच धुराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसताच त्यांनी शेजाऱ्यांना बोलाविले आणि ज्ञानेश्वर चौखे ह्यांच्या घरात आग लागल्याचे दिसून आले. दरम्यान नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाला कळविण्यात आले.

माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहचला त्याचबरोबर विद्युत वितरण विभागाचे कर्मचारी देखिल घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाने ही आग आटोक्यात आणली असुन सदर आग शॉर्ट सर्किट मुळे लागली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ह्या आगीत ज्ञानेश्वर चौखे  ह्यांचे बरेच नुकसान झाले असुन फ्रिज सुद्धा जळाला असल्याचे दिसले त्याचबरोबर त्यांच्या मधल्या खोलीत असलेला सिलिंग फॅनचे पाते सुद्धा उष्णतेमुळे वाकडे झाले आहे. नशीब बलवत्तर म्हणून घरातील दोनपैकी एकाही सिलेंडर चा स्फोट झाला नाही.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.