ETV Bharat / state

कोळसा तस्करी : वडेट्टीवारांनी पुरावे दिले तर पोलीस अधिकाऱ्यांचीही नार्को टेस्ट करू - गृहमंत्री

author img

By

Published : Jun 6, 2020, 8:45 PM IST

वडेट्टीवार यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. याची चौकशी झाल्यास जिल्ह्यातील कोळसा तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

chandrapur
चंद्रपूर

चंद्रपूर - विरोधी पक्षाचे उपगटनेते असताना विजय वडेट्टीवार यांनी कोळसा तस्करीबाबत खळबळजनक आरोप केला होता. वेकोली कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या संगनमताने दर महिन्याला 100 कोटींचा कोळसा चोरी केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेत केला होता. यातील घबाड समोर आणण्यासाठी वेकोलीचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडेट्टीवार यांनी याविषयी पुरावे दिले आणि त्यात तथ्य आढळले तर नक्कीच या विषयावर चौकशी होईल. याबाबत आपण वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी आहेत. त्यामुळे येथून मोठ्या प्रमाणात कोळसा तस्करी केली जाते. यासाठी एक मोठे नेटवर्क सक्रिय आहे. त्याला राजकीय वरदहस्त प्राप्त आहे. वेकोलीचे आणि पोलीस प्रशासनाचे बडे अधिकारी यात सामील आहेत. याच यंत्रणेबाबत त्यावेळी उपगटनेते असलेले विजय वडेट्टीवार यांनी धक्कादायक खुलासा केला होता. 23 जानेवारी 2019 ला घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी कोळसा तस्करीचे मोठे नेटवर्क कसे चालते याबाबत गंभीर आरोप केले होते. सत्ताधारी नेत्यांच्या वरदहस्ताने ही कोळसा तस्करी सुरू असून यात वेकोलीचे आणि पोलीस विभागातील बडे अधिकारीही सामील आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. याशिवाय ही तस्करी शक्य नाही असेही ते म्हणाले होते.

या माध्यमातून दर महिन्याला जवळपास 100 कोटींचा कोळसा चोरी केला जातो. यासंदर्भात उचस्तरीय चौकशी करून वेकोली आणि पोलीस विभागाचे बडे अधिकारी यांची नार्को टेस्ट करावी जेणेकरून हे मोठे घबाड समोर येईल, अशीही त्यांनी मागणी केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. वडेट्टीवार यांना कॅबिनेटमंत्री पद मिळाले आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही ते झाले. मात्र, यानंतर कोळसा तस्करी काही थांबली नाही. फेब्रुवारी महिन्यात असे 25 ट्रक पकडण्यात आले आणि पुन्हा हा विषय चर्चेला आला. वडेट्टीवार यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. याची चौकशी झाल्यास जिल्ह्यातील कोळसा तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची दाट शक्यता आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यासंबंधीची कुठली मागणी आपल्यापर्यंत पोहचली नाही. मात्र, वडेट्टीवार यांच्याकडे अशी माहिती असल्यास आणि त्यात तथ्य असले तर यावर केवळ नार्कोच नाही तर संपूर्ण चौकशी केली जाईल, तसेच याविषयावर आपण वडेट्टीवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात कोळसा तस्करी विरोधात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.