चंद्रपूर : मागील चोवीस तासांत चिमूर तालुक्यात ( Heavy rain in Chimur taluka ) झालेल्या संततधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती ( Flood situation) निर्माण झाली आहे. अनेक गांवात पाणी साचले असून एकूण 13 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील उमा नदी ( Uma River ) सातनाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन चिमूर शहरास पाण्याने वेढा ( Chimur city surrounded Flood ) दिला. ज्यात पेठ मोहल्ला, चावडी, खाती कामठा, मानीक नगर, क्रांती नगर, उप जिल्हा रुग्णालय व परीसरातील घरात पाणी घुसले. तसेच तालुक्यातील अनेक गांवाना पुरांचा फटका बसला आहे. तसेच नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव, शेडेगाव, गडपिपरी, खरकाडा, पिपंळनेरी, काग-सोनेगाव या गावांनाही पाण्याने वेढले आहे. प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने अनेक कुटूंबांना सुरक्षीतस्थळी हलविले. पुरग्रस्तांची तात्पुरत्या स्वरूपात शहिद बालाजी रायपुरकर सभागृह ( Shaheed Balaji Raipur Hall ) येथे व्यवस्था केल्याची माहीती नगर परीषद अधिक्षक प्रदिप रणखांब यांनी दिली.
हेही वाचा - Indore Amalner ST Accident : इंदोर-अमळनेर एसटी बस अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत
याही गावांना बसला फटका - चिमूर तालुक्यातील कवडशी, केसलापुर, अमरपुरी भान्सुली, सरडपार, चिखलापार, नेरी, नवतळा, कोटगाव, पांढरवानी, किटाळी (तुकुम), भिसी इत्यादी गावासह अनेक गावांना पुरांचा फटका बसला आहे. चिमूर तालुक्यातील जांभुळधाट, कोटगाव, नवतळा, चिमूर-नेरी, नेरी-शिवन, पायली, खडसंगी, मुरपार, मिनझरी, अमरपुरी,भान्सुली, चिमूर-भिसी हे मार्ग बंद झाले आहेत.
41 जणांना सुरक्षित स्थळी हलवले - चिमूर नगर परीषदेचे ( Chimur Nagar Parishad ) अधिक्षक प्रदिप रणखांब, अभियंता राहुल रणदिवे यांनी पुढाकार घेऊन सोनेगाव बेगडे येथील ५, गांधी वार्ड येथील ५, खाती कामठा येथील १८ तथा गुरुदेव वार्ड येथील १३ स्त्री, पुरुष बालकांचे रेस्कु करून एकूण 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
हेही वाचा - Presidential Election 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क, विधीमंडळात केले मतदान
नद्यांनी गाठली धोक्याची पातळी : जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. वर्धा- वैनगंगा- उमा नद्यांनी पातळी ओलांडली आहे. शहरालगतचे इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे दीड मिटरने उघडले आहे. यामुळे इरई नदीची पाणीपातळी वाढून शहराच्या सखल भागातील पूरस्थिती आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. पुराचे ताजे संकट चिमूर शहरातुन पुढे आले आहे. संततधार पाऊस आणि उमा नदीने पात्र सोडल्याने चिमूर शहराच्या सखल भागात पुराचे पाणी शिरले. टेलिफोन एक्सचेंज, तहसील कार्यालय, माणिकनगर या भागात पुराची तीव्रता अधिक आहे. चिमूर ते वरोरा आणि चिमूर ते कांपा हे मार्ग पुराच्या पाण्याने बंद झाले आहेत. 41 जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
अनेक मार्ग बंद : महाराष्ट्र-तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या राजुरा येथील पुलावरून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आता हे पाणी ओसरले असले तरी सुरक्षेच्या दृष्टीने हा मार्ग अद्याप बंद ठेवण्यात आला आहे. तसेच चंद्रपूर-गडचिरोली, घूघुस-गडचांदूर येथे पुलाचे पाणी ओसरले असले तरी, तूर्तास हे पूल बंद ठेवण्यात आले आहे. याची पाहणी केल्यावर हे पूल सुरू करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याची पूरपरिस्थितीची पाहणी दौरा करणार - विदर्भात फार जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे. वर्ध्यात सर्वाधिक जास्त पाऊस हिंगणघाट तालुक्यामध्ये झाला. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये ही जास्त पाऊस झाला आहे. ही आपत्कालीन परिस्थिती असून आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत. मंगळवारी वर्धा जिल्ह्याचा आणि चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहे असेही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच पूर्व विदर्भाचा आढावासुद्धा बैठकीत घेणार असल्याचेसुद्धा देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना म्हणालेत.