चंद्रपूर - चिमूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या खडसंगी पासून 6 किमी अंतरावरील जामनी (पुनर्वसन) येथे गावालगत आज (दि. 23 जानेवारी) सकाळी 11 वाजता भटकलेल्या अस्वलाने जामनी गावालगत आसरा घेतला होता. याची माहिती नागरिकांनी वन अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी त्याला जेरबंद केले.
अस्वलाविषयी माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे, खडसंगी क्षेत्राचे आर.एच. नागदेवते, वनरक्षक एन. डी. मडावी, वनरक्षक डी. जे. मैद, भिवापूरे, सी. एस. चिंचुलकर, एम. पी. उरडोह, वनरक्षक पाटील, वनरक्षक मडावी कर्मचारी अस्वलाला रेस्क्यू करण्यासाठी जाळी, पिंजरा घेऊन घटनास्थळी दाखल झाले होते.
हेही वाचा - चंद्रपुरात शिवभोजन योजनेला 26 जानेवारीपासून होणार सुरुवात
दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान वन कर्मचाऱ्यांना या अस्वलाला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश आले. अस्वलाला वैद्यकीय तपासणीसाठी खडसंगी येथील वनविभागाच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. अस्वलाला वनविभागाने जेरबंद केल्याने गावातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे.
हेही वाचा - वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, बोरगाव शेत शिवारातील घटना