ETV Bharat / state

Tiger And Leopard Caught चंद्रपुरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघासह बिबट्याला आज वनविभागाने केले जेरबंद, एका वाघिणीचा मृत्यू - वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 20 दिवसापासून एका वाघाने धुमाकूळ ( Forest Department Caught Tiger ) घातला होता. या वाघाने एका तरुणावर हल्ला करत त्याचा बळीही घेतला होता. त्याला जेरबंद करण्यात आज वनविभागाला यश आले. दुसरीकडे एका वनसडी वनपरिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला ( Forest Department Caught Leopard In Chandrapur ) पकडण्यातही वनविभागाला यश आले आहे. तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी वनपरिक्षेत्रातील एका विहिरीत वाघीण ( Found One Tigress Dead In Chandrapur ) मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Forest Department Caught Tiger
पकडण्यात आलेला वाघ
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:44 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघाला ( Forest Department Caught Tiger ) आणि एक बिबट्याला जेरबंद ( Forest Department Caught Leopard In Chandrapur ) करण्यात वनविभागाला यश आले. एक वाघीण मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. सावली तालुक्यात मागील वीस दिवसांपासून वाघाने धुमाकूळ ( Found One Tigress Dead In Chandrapur ) घातला होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्यासाठी वनविभाग कामाला लागला होता. वाघाला जेरबंद करण्यासाठी २५ कर्मचारी दिवसरात्र गस्त घालीत होते. अशातच आज सकाळी सकाळी साडे सात वाजता शार्पशूटरने वाघास बेशुद्ध करून जेरबंद केले.

Forest Department Caught Tiger
नागरिकांची गर्दी

पकडलेल्या वाघाने एका व्यक्तीचा घेतला बळी सावली तालुक्यात गेल्या 20 दिवसापासून एका वाघाने ( Tiger Attack On Man In Chandrapur ) धुमाकूळ घातला होता. यात या वाघाने निलसनी-पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी घेतला होता. वाघाने व्यक्तीचा बळी घेतल्याने परिसरात दहशत पसरली होती. त्यामुळे सावली तालुक्यातील नागरिक प्रचंड दहशतीत वावरत होते. अखेर आज या वाघाला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

वनसडी वनपरिक्षेत्रात बिबट्याचा धुमाकूळ दुसऱ्या घटनेत कोरपना तालुक्यातील वनसडी वनपरिक्षेत्रात महिन्याभरापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात एका सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. या बिबट्याला पकडण्यात वनविभागास यश आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्याचे कळताच नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

विहिरीत वाघीण मृत्तावस्थेत आढळल्याने खळबळ तिसऱ्या घटनेत ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी वनपरिक्षेत्रात येणाऱ्या गावातील रामाजी ठाकरे यांच्या विहिरीत वाघीण मृत्तावस्थेत आढळून आली. वाघीण चार ते पाच वर्षाची असल्याचा अंदाज वन विभागाने वर्तविला आहे. चार दिवसांपूर्वी ती विहिरीत पडली असावी, त्यात वाघिणीच्या मृत्यू झाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. शवविच्छेदनानंतर वाघिणीच्या मृत शरीराला अग्नी देण्यात आला. यावेळी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.